मुक्तपीठ टीम
चैत्यभूमी शेजारी अनधिकृत बांधकाम तोडण्याचे मुंबई मनपा ने रिपाइंला आश्वासन दिले आहे. चैत्यभूमी शेजारच्या हिंदू स्मशानभूमी आणि तेथील धर्मशालेला रिपब्लिकन पक्षाचा विरोध नाही. तेथे ३० फूट अनधिकृत बांधकाम केल्याने चैत्यभूमीचा स्तूप झाकला जात आहे. ते ३० फूट अनधिकृत बांधकाम तोडावे आणि तेथील धर्मशाळा चांगली बांधावी ही रिपाइं ची मागणी आहे.
मुंबई मनपा ने तेथील अनधिकृत ३० फूट बांधकाम तोडण्याची कारवाई सुरू केल्यानंतर स्थानिक आमदार सदा सरवनकर यांनी मनपाची कारवाई रोखत दगडफेकीची धमकी दिली. त्यांच्यावर पोलीस प्रशासन योग्य कारवाई करील. मात्र दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई पोलीस आणि मुंबई मनपाने हाणून पाडला आहे.
मनपाचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल साहेब यांनी संबंधित अनधिकृत बांधकाम नक्की निष्कसित करण्याचे आश्वासन रिपाइंला दिले आहे. सदर अनधिकृत बांधकाम निष्कसित नाही झाले तर रिपाइं आंदोलन छेडेल असा इशारा दिला आहे.