Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सोनिया गांधींनी घेतला महाराष्ट्रातील कोरोना स्थितीचा आढावा

April 11, 2021
in घडलं-बिघडलं
0
sonia gandhi

मुक्तपीठ टीम

 

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी आज देशातील काँग्रेस शासित राज्यातील मुख्यमंत्री, विधिमंडळ पक्षनेते यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंद्वारे संवाद साधून राज्यातील कोरोना स्थिती व लसीकरण मोहिमेचा आढावा घेऊन कोरोना नियंत्रण व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याबाबत मार्गदर्शन आणि सूचना केल्या.

 

काँग्रेस शासित राज्यांसोबत केंद्र सरकार दूजाभाव करत असून कोरोना प्रतिबंधक लस, टेस्टिंग किट, रेमडिसेवीर इंजेक्शन, ऑक्सीजन पुरवठा व इतर आवश्यक उपकरणांच्या वाटपात मोठ्या प्रमाणात असमतोल दिसून येत आहे. आरोग्य उपकरणांच्या वितरणात केंद्र सरकारने अधिक पारदर्शकता बाळगावी व राज्यांना पुरेशा प्रमाणात लस व इतर वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी व विधिमंडळ पक्षनेत्यांनी यावेळी मांडल्या.

 

या बैठकीला मार्गदर्शन करताना राहुल गांधी म्हणाले की, कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक ती सर्व पावले काँग्रेस शासीत राज्यांनी उचलली पाहिजेत पण त्याचा गरीब जनतेच्या उपजिवीकेवर विपरीत परिणाम होऊ नये याचीही काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कोरोना संसर्गाचा सर्वात जास्त दुष्परिणाम सर्वसामान्य व गरिबांच्या जीवनावर होतो आहे, त्यांच्या हिताची काळजी घ्या अशी सूचनाही त्यांनी केली.

 

काँग्रेस अध्यक्षांच्या समोर महाराष्ट्राची भूमिका मांडताना, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, महाराष्ट्र विकास आघाडी सरकार कोरोना विरोधातील लढाई पूर्ण ताकदीने लढत आहे. देशात सर्वात जास्त कोरोना चाचण्या महाराष्ट्रात केल्या जात आहेत. लसीकरणाच्या बाबतीतही महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. पण केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला हव्या तेवढ्या प्रमाणात लसीचा पुरवठा केला जात नाही. त्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. केंद्र सरकारने मागणीप्रमाणे महाराष्ट्राला पुरेसा लसीचा पुरवठा केला पाहिजे. राज्यात रेमडिसेवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने मोठ्या अडचणी येत आहेत. केंद्र सरकारने न्याय भावनेने रेमडिसेवीर इंजेक्शन आणि इतर वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा तातडीने राज्याला केला पाहिजे या मागण्या महाराष्ट्राच्या वतीने आदरणीय सोनियाजी गांधी यांच्यासमोर मांडल्या.

 

व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारा झालेल्या या बैठकीस राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, महाराष्ट्र विधिमडंळ काँग्रेस पक्षाचे नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, झारखंडचे अर्थमंत्री व झारखंड प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामेश्वर सोरेन यांच्यासह काँग्रेस अध्यक्षांच्या सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते.

 


Tags: rahul gandhiSonia Gandhiकाँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीराहुल गांधीरेमडिसेवीर इंजेक्शन
Previous Post

कोरोना पॉझिटिव्ह असूनही रेल्वेने प्रवास…घरी पोहचण्यापूर्वीच मृत्यू!

Next Post

“कोरोनाविरुद्धच्या लढाईत हलगर्जीपणा करु नका” – अजित पवार

Next Post
ajit pawar

"कोरोनाविरुद्धच्या लढाईत हलगर्जीपणा करु नका" - अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!