मुक्तपीठ टीम
मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये कनिष्ठ नियोजक या पदावर भरती आहे. आर्किटेक्चर किंवा सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पदवीधर असलेल्यांसाठी चांगली करिअर संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १२ एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. हा अर्ज ऑफलाइन पद्धतीने केला जाईल. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, आर्किटेक्चर किंवा सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पदवीधर तसेच अर्बन प्लॅनिंग, सिटी प्लॅनिंगमध्ये पीजी पदवी, अर्बन प्लॅनिंगमध्ये २ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. निवड केलेल्या उमेदवाराला ४० हजार दरमहा वेतन दिले जाईल.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे जास्तीत जास्त ५५ वर्षांपर्यंत असावे.
निवड
शैक्षणिक पात्रता आणि मुलाखतीतील कामगिरीच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता निश्चित केली जाईल. गुणवत्तेत ९०% वेटेज गुणांना आणि १०% वेटेज मुलाखतीला देण्यात येतील.
अर्ज कसा करावा
इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन मोडमध्ये अर्ज करावा लागेल. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख १२ एप्रिल २०२१ आहे. https://www.mumbaiport.gov.in/writereaddata/linkimages/6190550809.pdf या दिलेल्या लिंकवरुन अर्ज डाउनलोड करा आणि तो भरा आणि या पत्त्यावर पाठवा –
सचिव, सामान्य प्रशासन विभाग, पोर्ट हाऊस, दुसरा मजला, शूरजी वल्लभदास मार्ग, मुंबई – ४००००१.