मुक्तपीठ टीम
डिंभे डावा कालवा, डिंभे उजवा कालवा, घोड शाखा कालवा, मीना शाखा कालवा, पिंपळगाव जोगे डावा कालवा, या सर्व कालव्यांचे उद्यापासून तर कुकडी उजव्या कालव्याचे १० मे पासून आवर्तने सोडण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.
कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक आज मंत्रालयातील दालनात मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपरोक्त निर्णय घेण्यात आला. या आवर्तनांमुळे जवळपास २ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांसाठी मोठा लाभ होईल, असेही पाटील यांनी सांगितले.
या बैठकीसाठी माजी मंत्री बबनराव पाचपुते, खासदार सुजय विखे, आमदार रोहित पवार, आमदार अतुल बेनके, माजी आमदार राहुल जगताप, जलसंपदा विभागाचे अधिकारी, कुकडी कालवा सल्लागार समितीचे अधिकारी व इतर प्रमुख उपस्थित होते.