Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना निर्बंध…काय, कधी, कुठे, कसे? आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे

April 9, 2021
in featured, आरोग्य, घडलं-बिघडलं
0
Corona Restrictions Everything

मुक्तपीठ टीम

राज्य शासनाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ब्रेक दि चेन अंतर्गत विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत.
कोरोना निर्बंधांच्या कालावधीत नेमकं काय, कधी, कुठे, कसे करता येईल आणि काय करता येणार नाही, याविषयीच्या काही प्रश्नांची उत्तरे देण्याचा हा प्रयत्न आहे.

१.     डी मार्ट, रिलायंस, बिग बाजार सारखे मॉल्स उघडे राहणार का ?

४ आणि ५ एप्रिल रोजी राज्य शासनाने निर्बंधांबाबत आदेश काढले आहेत. जी दुकाने, मॉल्स यातील आवश्यक / जीवनावश्यक वस्तू विक्री करीत आहेत ते सुपर मार्केट्स, मॉल्स सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरु राहू शकतील. आवश्यक नसलेल्या वस्तूंचे विभाग बंद राहतील

२.     आठवड्याच्या शेवटच्या दिवशीच्या (विकेंड) लॉकडाऊनमध्ये काय सुरु राहील आणि काय बंद ?

ब्रेक दि चेनच्या आदेशात म्हटल्याप्रमाणे आवश्यक सेवा सुरु राहतील. कोणताही व्यक्ती योग्य कारणांशिवाय फिरू शकणार नाही. ही कारणे आदेशात नमूद आहेत.

३.     आठवड्याच्या शेवटच्या दिवशीच्या (विकेंड) लॉकडाऊमध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्या सुरु राहतील काय ?

कोविडसंदर्भातील सर्व आरोग्याचे नियम पाळून सुरु राहू शकतील. मात्र नियमांचे पालन होत नाही हे लक्षात आले तर स्थानिक राज्य शासनाची परवानगी घेऊन बाजार बंद करू शकतात. स्थानिक प्रशासनाने यासंदर्भात काटेकोर लक्ष ठेवणे अपेक्षित आहे

४.      बांधकाम दुकाने उघडी राहतील का ?

बांधकाम साहित्याची दुकाने बंद राहतील

५.     वाहनांची दुरुस्ती करणारे गॅरेजेस, ऑटोमोबाईल दुकाने उघडी राहतील का ?

वाहतूक सुरु असल्याने दुरुस्ती करणारी गॅरेजेस सुरु राहू शकतील. मात्र, त्यांनी कोविडविषयक आरोग्याच्या नियमांचे पालन करायचे आहे. याच्याशी संबंधित दुकाने मात्र बंद राहतील. कोविड नियम न पाळणारी गॅरेजेस कोविड संसर्ग असेपर्यंत बंद ठेवण्यात येतील.

६.     केंद्रीय कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापना (पीएसयू) आवश्यक सेवा म्हणून संबोधता येतील का ?

नाही. सर्व केंद्रीय कर्मचारी आणि पीएसयू हे आवश्यक सेवेत येत नाहीत. आवश्यक सेवेत समाविष्ट असणारेच केंद्र शासनाचे विभाग किंवा सार्वजनिक क्षेत्रातील या सेवेतील समजले जातील.

 

७.     नागरिक मद्य खरेदी करू शकतात का ?

हो. नागरिक हे ४ एप्रिल रोजी उपाहारगृहे आणि बारसाठी काढलेल्या आदेशाप्रमाणे निर्धारित वेळेत बारमधून टेक अवे पद्धतीने किंवा होमडिलिव्हरीने मद्य खरेदी करू शकतात.

८.     मद्यविक्री दुकान सुरु राहू शकतील का ? होम डिलिव्हरी होऊ शकेल का ?

नाही.

९.     रस्त्याकडेचा ढाबा सुरु राहू शकतो का ?

हो. पण उपाहारगृहांप्रमाणेच बसून जेवण करण्यास परवानगी नाही. पार्सल नेऊ शकतात.

१०. इलेक्ट्रिक उपकरणांची दुकाने (एसी, फ्रीज इत्यादी) सुरु राहू शकतील का?

नाही.

११.दूरसंचारशी सबंधित (डेस्कटॉप, मोबाईल इत्यादी) सुरु राहू शकतील ?

नाही.

१२. आपले सरकार, सेतू केंद्रे सुरु राहू शकतील ?

हो. आठवड्याच्या दिवशी (विक डेज) सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु राहू शकतात.

१३. आठवड्याच्या शेवटी रात्री ८ नंतर किंवा सकाळी ७ च्या आत उपाहारगृहे होम डिलिव्हरी करू शकतात का ?

आठवड्याच्या नियमित दिवशी ग्राहक उपाहारगृहांतून सकाळी ७ ते रात्री ८ यावेळेत पार्सल घेऊन जाऊ शकतात. या निर्धारित वेळेनंतर तसेच आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत (विकेंड) ग्राहक पार्सल घेऊ शकणार नाही. मात्र ई कॉमर्समार्फत तसेच उपहारगृहातून होम डिलिव्हरीमार्फत खाद्यपदार्थ मागवता येईल.

—

 आणखी एक महत्वाची माहिती: 

 

कर्मचाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी बरोबर शनिवारपासून ॲन्टीजन चाचणीचा पर्याय

 राज्य शासनाने कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य केली होती. आता त्याबरोबरच शनिवार, दि. 10 एप्रिल पासून ॲन्टीजन चाचणीही ग्राह्य धरण्यात येईल.

 


Previous Post

कोरोनाविरोधात हिरे व्यावसायिक ठाकरे सरकारसोबत

Next Post

कर्मचाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी बरोबर शनिवारपासून ॲन्टीजन चाचणीचा पर्याय

Next Post
Antigen test

कर्मचाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी बरोबर शनिवारपासून ॲन्टीजन चाचणीचा पर्याय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!