मुक्तपीठ टीम
कोरोनाची गंभीरता लक्षात घेऊन एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विद्यार्थी आणि पालकांकडून आभार मानले जात आहेत. पण यासर्वांमध्ये भावनेनं ओथंबलेली प्रतिक्रिया आली ती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानताना त्यांच्या संवदेनशीलतेचा खास उल्लेख केला आणि राजकारणात ती तशीच जागती ठेवण्याची विनंतीही केली.
आव्हाड यांनीच सर्वप्रथम परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि अन्य नेत्यांनी तशीच मागणी केली. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी या मुद्द्यावर फोनवर चर्चाही केली.
आव्हाडांनी मानले भावनापूर्ण आभार
“विद्यार्थ्यांच्या वतीने बोलत असताना आपला एक मंत्री म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जाहीर आभार मानतो. आज कोरोनाची वाढती परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता होती. जेव्हा मी सर्वप्रथम मागणी केली. दूरध्वनीवर बोललो. तेव्हाच जाणवलं की त्यांच्यातील संवेदना नेहमीसारख्याच जाग्या होत्या, हे तेव्हाच मला जाणवले. साहेब, तुमच्यातील संवेदना अशाच जाग्या ठेवा. त्या राजकारणाला बळी जाऊ देऊ नका. महाराष्ट्राला तुमच्याकडून याच अपेक्षा आहेत. परीक्षा पुढे ढकलल्या. विद्यार्थ्यांचे प्राण वाचवले, त्याबद्दल मी तमाम विद्यार्थी पालक यांच्यावतीने आभार मानतो.”
मा. मुख्यमंत्री साहेब तुम्ही परत एकदा माणुसकीचे दर्शन घडवल. तुमच्यातील ज्या संवेदना आज जिवंत आहेत त्या परत एकदा महाराष्ट्राला दिसल्या. महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या वतीने आपण MPSC आणि MBBS च्या ज्या परीक्षा पुढे ढकलल्या त्याबद्दल आपले जाहीर आभार!#mpscexam pic.twitter.com/tkNjFY4Ajm
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 9, 2021