मुक्तपीठ टीम
पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने सर्वसामानान्यांच्या खिशाला आग लागत असते. पण आज सतत दहाव्या दिवशीही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असल्याने दिलासा मिळाला आहे. पाच राज्यांपैकी चार राज्यांच्या निवडणुका झाल्या असल्या तरी बंगालच्या निवडणुकीचे काही टप्पे बाकी आहेत. त्यामुळे हा महिनभर तरी दरवाढीची भीती नाही, असे मानले जात आहे. कारण निवडणुकांपासून दरवाढ झालेली नाही.
पेट्रोलियम कंपन्यानी गेल्या मंगळवारी इंधनाच्या दरात घट केली होती. तेव्हा कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात २२ पैसे तर डिझेलच्या दरात २३ पैसांनी घट केली होती. त्यानंतर दरात बदल झालेले नाही. सतत दहाव्या दिवशीही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहेत.
प्रमुख शहरांमधील पेट्रोल-डिझेल
- मुंबईमध्ये पेट्रोल ९६.५६ रुपये प्रति लीटर तर डिझेल ८८.०६ रुपये प्रति लीटर
- दिल्लीत पेट्रोल ९०.५६ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ८०.८७ रुपये प्रति लीटर.
- कोलकत्तामध्ये पेट्रोल ९०.७७ रुपये प्रति लीटर तर डिझेल ८३.७५ रुपये प्रति लीटर
- चेन्नईमध्ये पेट्रोल ९२.५८ रुपये प्रति लीटर तर डीझेल ८५.५८ रुपये प्रति लीटर
पुढील दिवसात होणार आणखीण घट
आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाले आहेत. पण आपल्याकडे त्याचे प्रतिबिंब क्वचितच घटण्यात उमटते. वाढ मात्र नित्य मानली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमी असल्याने लवकरच पेट्रोल-डिझेलच्या दरात पुढे आणखीन घट होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कसे वाढतात पेट्रोल-डिझेलचे दर
- पेट्रोल-डिझेलच्या मुळ किंमतीत एक्साइज ड्यूटी, डीलर कमीशन आणि अन्य कर जोडल्यास याची किंमत जवळपास दुप्पट होते.
- जर केंद्र सरकारची एक्साइज ड्यूटी आणि राज्य सरकारचे व्हॅट काढून टाकले गेले तर डिझेल आणि पेट्रोलचे दर प्रतिलिटर २७ रुपयांनी मिळेल.
- परंतु केंद्र किंवा राज्य सरकार दोघांनाही हा कर काढून टाकता येणार नाही. कारण सर्वात जास्त उत्पादन हे सरकारला यातून मिळते.