मुक्तपीठ टीम
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुस्लिम तरुणाला जवळ घेतलेले छायाचित्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे. आता एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान मोदींवर त्याच छायाचित्रावरून निशाणा साधला आहे.
ओवेसी यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे ज्यामध्ये तो मुस्लिम तरुण पंतप्रधान मोदींच्या काय सांगत आहेत, ते त्यांच्या शब्दात कल्पना करत मांडले आहे. यादरम्यान, ते पंतप्रधान मोदी आणि सीएए, एनआरसीवर टीका करतानाही दिसत आहेत.
ओवेसी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आणि त्या व्हिडीओमध्ये आपले शब्द वापरले आहेत.
छायाचित्र मोदींचे, शब्द ओवैसींचे -१
ट्विटरवर आपली पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिले की, पंतप्रधान मोदींच्या कानात तो तरूण मोदींना “मी बांग्लादेशी नाही” एनआरसी आणि सीएएला लक्ष्य साधत ते पुढे म्हणाले, “मोदीजी मी कागद नाही दाखवणार” असे सांगत असावा.
छायाचित्र मोदींचे, शब्द ओवैसींचे – २
ओवेसी म्हणतात की, तरूणाने मोदीजींना सांगितले आहे की, “मोदीजी तिहेरी तलाक कायद्याचे आम्ही पालन करीत नाही.”
छायाचित्र मोदींचे, शब्द ओवैसींचे -३
टोपीवरुनही ओवैसी यांनी मोदींवर टोला लगावला. तो तरुण मोदींना म्हणाला, “माझ्यासारखी टोपी कधी घालणार तुम्ही?
छायाचित्र मोदींचे, शब्द ओवैसींचे -४
ते पुढे म्हणाले की, त्याने पुढे असेही सांगितले की, “मोदीजी, मी डोक्यावर टोपी घातली आहे, परंतु तुम्ही देशातील जनतेला टोपी घालू नका.”
What was the man in a skull cap whispering in @PMOIndia’s ear?pic.twitter.com/RRimiQ4JEi
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) April 8, 2021
वास्तव: मोदींनी काय विचारलं, त्या तरुणाने काय सांगितले?
पश्चिम बंगालमधील प्रचारादरम्यान व्हायरल झालेल्या या मुस्लिम तरुणाचे नाव झुल्फिकार आहे आणि तो ३ एप्रिल रोजी पंतप्रधान मोदींच्या मेळाव्यात सहभागी झाला होता. मेळाव्यादरम्यान तो पंतप्रधानांना भेटला तेव्हा पंतप्रधान मोदींनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. याशिवाय या दोघांमध्ये काही संभाषणही झाले. या संभाषणाविषयी एका प्रश्नाला उत्तर देताना झुल्फिकार म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी त्यांचे नाव विचारले आणि आपल्याला काय व्हायचे आहे असे विचारले.