मुक्तपीठ टीम
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्यी सीबीआय चौकशीस थांबवण्याचा माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्य सरकारचा प्रयत्न सपशेल अपयशी ठरला आहे. अनिल देशमुख आणि राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालायत याचिका फेटाळून लावण्यात आल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, ज्यांनी हे आरोप केले आहेत ते तुमचे शत्रू नाहीत. एकेकाळी परमबीर सिंह तुमचा उजवा हात होते. तसेच या प्रकरणी महाराष्ट्रातील मोठे अधिकारी गुंतले असून अनिल देशमुख आणि परमबीर सिंह या दोघांचीही चौकशी झाली पाहिजे असे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले.
सर्वोच्च न्यायलयात अनिल देशमुख आणि राज्य सरकारच्याबाजूने कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला. यावेळी सिब्बल यांनी युक्तिवाद करत म्हटले की, “कायदा सर्वांसाठी एक असतो. एखाद्या पोलीस आयुक्तांनी आरोप केले म्हणजे ते पुरावा होत नाही”. पण या युक्तिवादाला फेटाळून लावत या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे आता सीबीआय चौकशी होणार हे निश्चित झाले आहे.