Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘ब्रेक द चेन’च्या अनुषंगाने गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला कायदा व सुव्यवस्थेचा आढावा

April 8, 2021
in सरकारी बातम्या
0
Minister Shri Shambhuraje Desai

मुक्तपीठ टीम

‘ब्रेक द चेन’ (Break The Chain) बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाच्या अनुषंगाने गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. यावेळी गृह (विशेष), प्रधान सचिव विनीत अग्रवाल, अतिरिक्त पोलीस महासंचालक कुलवंत कुमार सरंगळ उपस्थित होते.

गृह राज्यमंत्री देसाई म्हणाले, संचारबंदी व जमावबंदी यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, जाणीवपूर्वक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यां व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई करावी. विविध संघटना, राजकीय पक्षाचे पदाधिकारी व व्यक्ती यांना या प्रक्रियेबाबत सहकार्य करण्याबाबतची विनंती करण्यात यावी. याउपरही विरोध होत असल्यास कठोर कारवाई करण्यात यावी. असे निर्देशही देसाई यांनी यावेळी दिले.

येत्या काळात रमझान ईद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी, गुढीपाडवा हे सण साजरे करत असतांना शासन आदेशाचे करण्यात यावे. तसेच वाढत्या कोरोना प्रादुर्भावाला यशस्वीपणे पायबंद घालण्यासाठी पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी यांनी दक्षता घ्यावी, शासन आदेशात नमुद केलेल्या अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरु राहतील त्या अनुषंगाने सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहनही देसाई यांनी केले.

कोकणचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिगावकर, औरंगाबादचे विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. प्रसन्ना, नागपूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेडचे निसार तांबोळी, कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहीया, विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावतीचे सि. के. मिना व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे उपस्थित होते.

 


Tags: Break The Chainगृह राज्यमंत्री शंभूराज देसाईडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीब्रेक द चेनमुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Previous Post

#मुक्तपीठ गुरुवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

Next Post

चार्टर्ड अकाउंटट, कंपनी सेक्रेटरीजसाठी ‘एसओपी’ सादर करण्याचे मुख्यमंत्री ठाकरेंचे निर्देश

Next Post
uddhav

चार्टर्ड अकाउंटट, कंपनी सेक्रेटरीजसाठी ‘एसओपी’ सादर करण्याचे मुख्यमंत्री ठाकरेंचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!