मुक्तपीठ टीम
भारतात सध्या लसीची टंचाई जाणवत आहे. सरकारी आणि इतर प्रयत्नांमुळे लोकांचा कल लसीकडे वाढत आहे. पण त्यामुळे सध्या उपलब्ध असलेला लसींचा पुरवठा पुरेसा ठरत नाही. सध्या देशात सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाची कोव्हिशिल्ड आणि भारत बाायोटेकने तयार केलेली कोव्हॅक्सिन लस लोकांना उपलब्ध करुन दिली जात आहे. पण ती पुरत नाही.
त्यामुळेच लसीचा साठा कमी पडू नये यासाठी विविध कंपन्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस निर्माण करणे ही काळाची गरज मानली जात आहे. यात आता पॅनेसिया बायोटेक ही रशियन कंपनी पुढे आली आहे. दरवर्षी ही कंपनी स्पुटनिक-व्ही या कोरोनाविरोधी लसीचे १० कोटी डोस भारतात तयार करणार आहे.
ही लस रशियाच्या डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (RDIF) आणि पॅनेसिया संयुक्त विद्यमानाने तयार करणार आहे. तसेच या लसीच्या मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाने आरडीआयएफच्या आंतरराष्ट्रीय ग्राहकांनाही ती लस पुरवण्यास मदत होणार आहे.
संपूर्ण जग कोरोना महामारीशी लढा देत आहे. सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नवीन प्रकरणे तीव्रतेने वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. या विषाणूशी लढा देण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यावरील लस आहे. त्यामुळे जगात आजही अनेक देशांमध्ये लस उपलब्ध नाही. जेथे आहे तेथे ती पुरत नाही. त्यामुळे दहा कोटी डोस एवढ्या प्रमाणावर लसीचे उत्पादन सुरु झाले तर टंचाईवर मात होऊन जीव वाचवणे शक्य होऊ शकेल.
पाहा व्हिडीओ: