मुक्तपीठ टीम
भारतातील कार ग्राहकांचा मोठा वर्ग टाटा मोटर्सकडे वळताना दिसत आहे. केवळ भारतात बनवलेली नाही तर भारतीय मालकीच्या कंपनीच्या मेड इन इंडिया कारची विक्री वाढत असल्याने ही टाटा समुहाप्रमाणेच भारतीयांसाठीही चांगली बातमी आहे. टाटा मोटर्सने मार्च महिन्याचा विक्री अहवाल नुकताच जाहीर केला आहे. टाटा मोटर्सच्या सर्व विभागांच्या विक्रीत विक्रमी वाढ नोंदवली गेली आहे. मार्च महिन्यात वाहनांच्या एकूण विक्रीत ५०५ टक्क्यांची वाढ झाली आहे, तर प्रवासी वाहनांमध्ये ४२२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील महिन्याच्या तुलनेत टाटा मोटर्सच्या विक्रीत जवळपास ९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
भारतीय बाजारात टाटा मोटर्सची मार्च २०२१ मध्ये ६६,६०९ युनिट्स विक्री झाली, मार्च २०२० मध्ये ११,०१२ युनिट्स विक्री झाली या विक्रीमध्ये ५०५ टक्क्यांनी वाढ झाली.
टाटा मोटर्सच्या १ एप्रिल २०२० ते मार्च २०२१ पर्यंत ४६४,५१५ युनिट्स कारची विक्री विक्री झाली, तर १ एप्रिल २०१९ ते मार्च २०२० पर्यंत ४४२,०५१ युनिट्स कारची विक्री झाली. या विक्रीमध्ये ५ टक्क्यांनी वाढ झाली.
टाटाच्या पॅसेंजर वाहनांची फेब्रुवारी २०२१ मध्ये २९,६५४ युनिट्स विक्री झाली, तर जानेवारी २०२१ मध्ये ५,६७६ वाहनांची विक्री झाली या विक्रीमध्ये ४२२ टक्क्यांनी वाढ झाली.
टाटा पॅसेंजरची वाहने चालू आर्थिक म्हणजेच १ एप्रिल २०२० ते मार्च २०२१ पर्यंत २२२,०२५ युनिट्सची विक्री झाली, तर १ एप्रिल, २०१९ ते मार्च २०२० पर्यंत १३१,१९६ वाहनांची विक्री झाली. या विक्रीमध्ये ६९ टक्क्यांनी वाढ झाली.
टाटाच्या कमर्शियल वाहनांची फेब्रुवारी २०२१ मध्ये ४०,६०९ युनिट्सची विक्री झाली, तर फेब्रुवारी २०२० मध्ये ७,१२४ युनिट्सची विक्री झाली या विक्रीमध्ये ४७० टक्क्यांनी वाढ झाली.
पाहा व्हिडीओ: