मुक्तपीठ टीम
जंगलाला लागणारे…लावले जाणारे वणवे ही नेहमीच चिंतेची बाब. या आगी कशा विझवायच्या हा नेहमीच पडणारा प्रश्न. पण आता मोठे वणवे विझवण्यासाठी आपले हवाई दलही सरसावले आहे. हवाई दलाच्या हेलिकॉप्टर्सनी उत्तराखंडमधील जंगलातील वणव्यांशी झुंज दिली आहे. हेलिकॉप्टर्सनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दोन दिवस या आगीचा सामना केला.
ही आग उत्तराखंडमधील नरेंद्रनगर वन विभागातील जंगलात लागली होती. वायुसेनेच्या एमआय -१७ हेलिकॉप्टरने श्रीनगर तलावाचे पाणी फवारणी करून या आगीवर नियंत्रण मिळविले गेले आहे. आग विझवण्यासाठी हेलिकॉप्टरने तीन फेऱ्या केल्या आहेत. दुपारी प्रतिकूल हवामानामुळे ऑपरेशन थांबवावे लागले. त्याचवेळी वन कामगारही राज्यातील विविध ठिकाणी जंगलांमध्ये लागलेली आग विझविण्यात गुंतले आहेत.
पौरी जिल्ह्यातील खिरसू विकासखंडाच्या नागदेव रेंजमधील दोन ठिकाणीही हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे पाणी फवारले जात आहे. सध्या नागदेव रेंजच्या दोन ठिकाणी सुमारे ७ ते ८ हेक्टर जंगलाला आगीचा धोका आहे.
पाहा व्हिडीओ: