Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज ठाकरे शरद पवारांना भेटणार!

April 6, 2021
in घडलं-बिघडलं
0
raj thackeray (2)

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी जमील शेख यांच्या हत्येप्रकरणात ठाण्यातील नगरसेवक नजीब मुल्ला यांचं नाव आलं आहे. नजीब मुल्ला हे राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. पोलिसांनी केलेल्या तपासातून ही माहिती समोर आली. सत्ताधारी पक्षाचे लोकच दिवसाढवळ्या लोकांना मारत असतील तर हे बरोबर नाही. या प्रकरणात सरकार काय करतेय ते पाहणारच आहे. नाही तर दुसऱ्यांचेही हात बांधलेले नाहीत. खुनाला उत्तर खुनाने देणं हे चित्रं महाराष्ट्रासाठी योग्य राहणार नाही, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेत नजीब मुल्लावर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.

राज ठाकरे यांनी कृष्णकुंज निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी “माझ्या पक्षातील सहकारी जमील शेख यांची हत्या झाली. या हत्याप्रकरणाचा पोलिसांकडून उत्तर प्रदेशपर्यंत तपास करण्यात आला. यावेळी काही आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींनी कबुली जबाब दिला असून, यात राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्लांचं नाव आलं आहे. उत्तर प्रदेश पोलिसांची प्रेसनोट आहे. त्यामध्ये नजीम मुल्लांचं नाव आहे. नजीब मुल्ला यांनीच जमील शेख यांची हत्या करण्याची सुपारी दिली होती, असं या प्रेसनोटमध्ये म्हटलेलं आहे. सत्ताधारी पक्षाचे लोक दिवसाढवळ्या लोकांना मारत आहेत, असा इशारा दिला. याच नजीम मुल्लांचं नाव सूरज परमार बिल्डर आत्महत्या प्रकरणात आलं होतं. ती केसही रफादफा झाली. आता पुन्हा नाव आलं आहे. आता राज्य सरकार काय करतंय हे पाहतोय,”असं राज ठाकरे म्हणाले.

दुसऱ्यांचेही हात बांधलेले नाहीत-राज ठाकरे

या प्रकरणी शरद पवार यांची भेट घेणार आहे. अशी मंडळी त्यांना सांभाळायची असतील, तर दुसऱ्यांचे हातही बांधलेले नसतात. खुनाचे उत्तर खुनाने अशा गोष्टी महाराष्ट्रात सुरु झाल्या, तर हे चित्र चांगलं दिसणार नाही. नजीब मुल्ला याच्यावर कारवाई आणि शिक्षा होणं आवश्यक आहे, त्यासाठी शरद पवारांची भेट घेणार आहे.

Tags: जमील शेखनजीब मुल्लाराज ठाकरेशरद पवार
Previous Post

एलॉन मस्क यांच्या सहा चाकी गोल्डन कारच्या छायाचित्रात काय दडलंय?

Next Post

गुन्हेगारी महत्वाचे : 1) प्रसिद्ध टीव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मध्ये अभिनेता म्हणून दिसणार्‍या मिराजला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या अभिनेत्याला चेन स्नॅचिंगच्या प्रकरणात पोलिसांनी पकडले आहे. खरंतर क्रिकेट सट्टेबाजीच्या वाईट व्यसनामुळे हा अभिनेता कर्जात बुडाला आणि मग कर्ज फेडण्यासाठी गुन्हेगारी दुनियेचा मार्ग अवलंबला. 2)उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. चहा नाही तयार केला म्हणून पतीने पत्नीला तलाक दिला आहे.महिलेच्या तक्रारीकडे पोलिसांकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला जात आहे. पीडितेने कोर्टात अर्ज दाखल करून न्याय देण्याची विनंती केली आहे. 3)अमेरिकेत मिसौरी भारतीय अभियंत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील भोपाळचा रहिवासी असलेल्या ३२ वर्षीय शरीफ रहमान खान असे या तरुणाचे नाव आहे. मैत्रिणीशी असलेल्या एकतर्फी प्रेमामुळे शरीफची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 4) ऑनलाईन लुडो या खेळात वारंवार पराभव होत असल्याने रागाच्या भरात तरुणाने मित्राचीच हत्या केली. मुंबईतील मालाड परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला. ही बाब उघडकीस नये म्हणून या मित्रानेच १० हजार रुपये देऊन बोरिवलीतील एका हॉस्पिटलमधून बनवट मृत्यूचा दाखला बनवून घेतला. मयत तरुणाच्या कुटुंबाला नैसर्गिक मृत्यू असल्याचं भासवून अंत्यसंस्कारही करण्यात आले.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!