मुक्तपीठ टीम
जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत अव्वल स्थान गाठलेल्या टेस्लाचे सीईओ आणि स्पेसएक्सचे संस्थापक एलॉन मस्क सातत्यांने सोशल मीडियावर सक्रिय असतात. यातच आता एलॉन मस्क यांचे एक ट्विट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. एलॉन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या ट्विटर अकाउंटवर सहा चाकी गोल्डन कारचा फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत एलॉन मस्क यांनी त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “मी इन माय सिक न्यू कार”. या ट्विटला पाहाताच हाजारो युजर्सनी त्याच्यावर प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.
एलॉनने शेअर केलेल्या फोटोत काय?
- फोटोमध्ये दिसणाऱ्या ६ चाकी गोल्डन कारवर आकर्षक कलाकृती केल्याचे पाहायला मिळत आहे.
- मस्कच्या या ट्विटला २ लाख ४६ हजारांहून अधिक लाईक्स, १२ हजार रीट्विट्स आणि ६० हजारहून अधिक प्रतिक्रिया आल्याचे पाहायला मिळत आहेत.
- दरम्यान, अनेक युजर्सना एलॉन मस्क ने ही कार का खरेदी केली? तर काही युजर्सना खरच ही कार मस्क यांनी विकत घेतली आहे का? असे प्रश्न पडले आहेत.
Me in my sick new car
(left him the money) pic.twitter.com/EGaY1FVfHm— Elon Musk (@elonmusk) April 3, 2021
मिळालेल्या माहितीनुसार, २००४ मध्ये एलॉन मस्क यांनी टेस्ला या इलेक्ट्रिक कारच्या कंपनीची स्थापना केली होती. यावेळी ते म्हणाले होते की, “भविष्यात सर्व काही इलेक्ट्रिकवर आधारित असेल, स्पेसमध्ये जाणारे रॉकेटसुद्धा आणि हे बदल घडवण्यात टेस्ला महत्त्वाची भूमिका बजावेल”.
We don’t need roads 😉 pic.twitter.com/4Jsg1Io9mJ
— Thee Barron Đoge (@BarronThee) April 3, 2021
काय आहे फोटो मागेच सहस्य?
पण एलॉन मस्क यांनी शेअर केलेल्या फोटोमधील कारचे सत्य समोर आणण्याचे काम काही युजर्सने केले आहे. या युजर्सनी ‘सायबरपंक २०७७’ या व्हिडीओ गेममधील स्क्रिनशॉट शेअर केला आहे. या गेमचा एलॉन मस्क सर्वात मोठा चाहता आहे. त्यांनी २०२१ च्या सुरुवातीला सांगितले होते की, टेस्ला मॉडल एस कारमध्ये गेमिंग लॅपटॉपवर व्हिडीओ गेम खेळता येऊ शकणार आहेत.
I think I’ve seen this car, in the videogame Cyberpunk. #cyberpunk https://t.co/mVNvwUhJAO
— Eugene James (@Eugene2671) April 3, 2021