मुक्तपीठ टीम
नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये एक्झिक्युटिव या पदासाठी ९७ जागा, सुपरवायझर कम चार्जमन या पदासाठी ७१ जागा, सिनिअर टेक्निशिअन कम ऑपरेटर या पदासाठी २७ जागा, टेक्निशिअन कम ऑपरेटर या पदासाठी १५ जागा अशा एकूण २१० पदांवर भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १५ एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- बी.ई/ बी.टेक आणि ४ वर्षे अनुभव
२) पद क्र.२- कोणत्याही शाखेत इंजिनीअरिंग डिप्लोमा आणि ५ वर्षे अनुभव
३) पद क्र.३- कोणत्याही ट्रेड मध्ये आयटीआय आणि ८ वर्षे अनुभव
४) पद क्र.४- १०वी उत्तीर्ण / आयटीआय आणि ४ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ६५ वर्षांपर्यंत असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या कोणत्याही उमेदवारांकडून शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी
नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या अधिकृत वेबसाइट https://www.nmdc.co.in/ वरून माहिती मिळवू शकता.