मुक्तपीठ टीम
अगदी चित्रपटात दाखवतात तसे घडले. मध्यप्रदेशच्या शेरपूर गावातील ही घटना आहे. एक शेतकरी मशिदीत नमाज पढत असताना त्याच्या शेतात आग लागली. त्यावेळेस त्याच्या शेजारी शेतकर्यांनी कसलाही विचार न करता ती आग रोखली आणि विझवली. त्यामुळे जवळपास ३०० गुंठे शेतात असलेले गव्हाचे पीक वाचले. मुस्लिम शेतकरी म्हणाले की, हिंदू बांधव आग विझविण्यासाठी पुढे आले नसते, तर त्यांची वर्षभर केलेली मेहनत वाया गेली असती.
विदिशा जिल्ह्यातील शेरपूर गावातील बहुतेक शेतकरी स्थानिक मशिदीत नमाजसाठी गेले होते. त्याच वेळी नफिस खानच्या १० गुंठे शेतात गव्हाच्या पिकाला भीषण आग लागली. आजूबाजूच्या शेतात पिकाची काढणी सुरू होती. या शेतात लागलेली आग पाहून शेजारील शेतकरी एकत्र आले. शेरपूरपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या सातपारा सराय आणि रसल्ली या गावातील गावकरीही धावत आले. तीन गावातील शेतकऱ्यांनी शेताचे मालक तेथे नसल्याने स्वत:च पुढाकार घेतला. आग विझवली.
आग विझविण्यास सुरुवात केली. जोरदार वाऱ्यासह आगीचे भडके होत होते. असे असूनही लोक झाडाच्या फांद्या व ट्रॅक्टरच्या सहाय्याने आग विझविण्यास सुरूवात करत राहिले. आगीची माहिती मशिदीत पोहोचताच मुस्लिम शेतकरी ही तेथे पोहोचले, पण तोपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविले गेले होते. नफीसशिवाय त्याचा भाऊ कादिर खान यांचेही १५ गुंठे शेतातील गहू जळून गेले. चांगली गोष्ट अशी की २०० हून अधिक गावकऱ्यांच्या मदतीने आगीवर लवकर नियंत्रण आले, अन्यथा ३०० गुंठे शेतात असलेला गहू भस्म झाला असता.
आपला जीव धोक्यात घालl, ट्रॅक्टरद्वारे आग विझविण्यास मदत करणाऱ्या शेतकऱ्याच्यामते आग विझवताना ते मुसलमानाचे पीक वाचवत आहेत हे कुणाच्याही मनात नव्हते. कष्टाच्या पिकामध्ये कोणतीही जात नाही. सातपाडा सराय या शेजारच्या गावचे सरपंच प्रतिनिधी रईस अहमद यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या गावात हिंदू-मुस्लिम बद्दल कधीही भेदभाव नाही.
पाहा व्हिडीओ: