मुक्तपीठ टीम
देशातील चार राज्यात आणि एका केंद्र शासित प्रदेशात सध्या निवडणुकीची रणधुमारी पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी आसाममध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. यावेळी, भाजपा उमेदवाराच्या गाडीत ईव्हीएम मशीन सापडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याच दरम्यान, सोशल मीडियावर भाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांचा एक जुन्हा व्हिडीओ व्हायरल होत असून यात ते “ईव्हीएम मशीनला होलसेल फ्रॉड” म्हणताना दिसत आहे.
Subramanian Swamy ji do you still believe EVM is a “Whole Sale Fraud?” If so would you please join us on our Campaign to go back to Ballot Box? pic.twitter.com/Fb00VXZXRj
— digvijaya singh (@digvijaya_28) April 3, 2021
हा व्हिडीओ काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी शेअर करुन आसाममध्ये घडलेल्या घटनेतल्या पार्श्वभूमीवर “आजही तुमचा हाच विचार आहे का? जर असेल तर बॅलेट बॉक्ससाठी आमच्या या मोहिमेत आमच्यासोबत येऊ शकता का? असे प्रश्न ट्विट करत सुब्रमण्यम स्वामी यांना विचारले आहेत. आसाममध्ये भाजपा उमेदवारांच्या गाडीत ईव्हीएम मशीन आढळून आल्या प्रकरणी निवडणूक आयोगाने चार अधिकाऱ्यांना निलंबित केले असून या घटनेचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश करीमगंज जिल्ह्यातील निवडणूक अधिकाऱ्यांना दिला आहे.
तसेच ईव्हीएम मशीन आढळून आलेली गाडी ही आसाममधील पाथरकांडीच्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणाऱ्या भाजपाचे उमेदवार कृष्णेंदू पाल यांची असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर कारवाई केली जावी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.