मुक्तपीठ टीम
एटीएममधून पैसे काढण्यासाठी यापुढे डेबिट कार्डची आवश्यकता भासणार नाही. यूपीआय ॲपद्वारे क्यूआर कोड स्कॅन करून एटीएममधून पैसे काढता येतील.एटीएम निर्माता एनसीआर कॉर्पोरेशनने सांगितले की,त्यांनी युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस प्लॅटफॉर्मवर आधारित पहिला इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विड्राल (आयसीसीडब्ल्यू) समाधान लाँच केला आहे. ही नवीन सुविधा सुरू करण्यासाठी सिटी युनियन बँकेने एनसीआरशी हात मिळवला आहे. बँकेने क्यूआर कोड आधारित इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विड्राल सुविधेला अनुमती देण्यासाठी आपल्या १,५०० एटीएमला आधीच अपग्रेड केले आहे.
सिटी युनियन बँकेचे व्यवस्थापकीय संचालक एन. कामकोडी म्हणाले की, आम्ही आयसीसीडब्ल्यू सोल्यूशन्स समाधानित करण्यासाठी एनसीआरशी भागीदारी केली आहे,जी आम्हाला आमच्या ग्राहकांना पुढील पिढीचे समाधान करण्यास सक्षम ठरेल. हे यूपीआय क्यूआर कोड वापरुन तुम्ही आमच्या एटीएममधून रोख पैसे काढू शकता.
कसे करेल काम?
१)नवीन एटीएममधून पैसे काढण्यासाठी पहिल्यांदा स्मार्टफोनमधील यूपीआय अॅप (जीपी, बीएचआयएम, पेटीएम, फोनपे, ॲमेझॉन) उघडणे आवश्यक आहे.
२)यानंतर एटीएम स्क्रीनवर दाखवलेले क्यूआर कोड स्कॅन करावे लागेल.
३)वापरकर्त्यांना स्क्रीनवर क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल आणि त्यांच्या फोनद्वारे रोख पैसे काढणे अधिकृत करावे लागेल.
४)व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी, क्यूआर कोड सतत बदलला जाईल. पैसे काढण्याची मर्यादा सध्या ५,००० इतकी आहे.
किती सुरक्षित?
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून,हि आतापर्यंत दिले गेलेले सर्वात सुरक्षित सुविधा आहे. कारण कार्ड प्रत्यक्षरित्या स्वाइप करण्याची आवश्यकता नसते, आपले कार्ड स्किम्ड केले जाऊ शकते असा कोणताही मार्ग नाही. यामध्ये क्यूआर कोडची कॉपी ही तयार केली जाणार नाही.