मुक्तपीठ टीम
एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये प्राचार्य या पदासाठी १७३ जागा, उपप्राचार्य या पदासाठी ११४ जागा, पदव्युत्तर शिक्षक (पीजीटी) या पदासाठी १२०७ जागा, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी) या पदासाठी १९०६ जागा अशा एकूण ३,४०० पदांवर भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३० एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- पदव्युत्तर पदवी, बी.एड, हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य तसेच १० वर्षे अनुभव
२) पद क्र.२- पदव्युत्तर पदवी, बी.एड, हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य तसेच २ वर्षे अनुभव
३) पद क्र.३- ५०% गुणांसह पदव्युत्तर पदवी, बी.एड, हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य.
४) पद क्र.४- ५०% गुणांसह पदव्युत्तर पदवी, बी.एड, एसटीइटी / सीटीइटी तसेच हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
पद क्र.१ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ५० वर्षांपर्यंत, पद क्र.२ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ४५ वर्षांपर्यंत, पद क्र.३ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ४० वर्षांपर्यंत, तर पद क्र.४ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३५ वर्षांपर्यंत असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी
मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्सच्या अधिकृत वेबसाइट https://tribal.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.
पाहा व्हिडीओ: