मुक्तपीठ टीम
देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत आहे. दिवसेंदिवस कोरानाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे. परंतु दुसर्या लाटेतील मृत्यूप्रमाण पाहिले तर सध्या कोरोना विषाणू अधिक संसर्गजन्य ठरत असेल परंतु कमी प्राणघातक ठरण्याची शक्यता आहे. काही डॉक्टरांच्या मते आणखी काही दिवसांच्या आकडेवारीचा अभ्यास करुनच याविषयी भाष्य करणे योग्य राहिल.
कोरोना महामारीचा मागील वर्षी जानेवारीत सुरू झालेला पहिला टप्पा सप्टेंबरमध्ये शिखरास पोहचला. या वर्षाच्या फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत संसर्गवेग घटला होता. फेब्रुवारीनंतर सुरू झालेल्या नवीन टप्प्यात बहुतेक राज्ये जिथे संसर्ग पुन्हा वाढत आहे.
महाराष्ट्रात, पहिली लाट ९ मार्च २०२० रोजी सुरू झाली आणि २२ डिसेंबर २०२० रोजी संपली. जेव्हा दररोजच्या सरासरी प्रकरणे किमान पातळीवर पोहचली तेव्हा या २८८ दिवसांच्या कालावधीत १९ लाख प्रकरणे नोंदली गेली. त्यांची सरासरी २२ डिसेंबरपासून दिवसाला ६,६०६ आहे. राज्यात प्रकरणांमध्ये आणखी वाढ दिसून येत आहे. शुक्रवारी एका दिवसात ४३ हजार नवे रुग्ण सापडले आहेत.
दैनंदिन प्रकरणांमध्ये होणारी वाढ होत असतानाच मृत्यूंचे प्रमाण तेवढे नाही. गेल्या लाटेशी तुलना करता मृत्यूच्या संख्येत घट झाली आहे. पंजाबमध्ये ४१%, गुजरातमध्ये ८३%, मध्य प्रदेशात ७२% आणि चंदीगडमध्ये ६५% घट झाली आहे. तज्ज्ञांच्या मते संपूर्ण देशाचा विचार करता, एकूण मृत्यूचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत एक तृतियांश आहे, कारण हा विषाणू अधिक संसर्गजन्य आणि कमी प्राणघातक आहे असे दिसते. त्यामुळे सध्याच्या टप्प्यात मृत्यूसंख्या कमी असण्याची शक्यता आहे.
अर्थात महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढत असतानाच आता मृत्यूसंख्याही वाढू लागली आहे. त्यामुळे सध्याच्या लाटेबद्दल आणखी काही दिवसांनी भाष्य करणे योग्य राहिल असेही काही डॉक्टरांचे मत आहे.