मुक्तपीठ टीम
उर्जा मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या आणि उर्जा क्षेत्रातील भारताच्या बिगर बँकिंग वित्तीय कंपनी असलेल्या पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन या केंद्रीय सार्वजनिक नवरत्न उपक्रमाने ३१ मार्च २०२१ रोजी आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी भारत सरकारला सरकारची मालकी असलेल्या १,४७,८२,९१,७७८ समभागांवरील (५६%) ११८२.६३ कोटी रुपयांचा अंतरिम लाभांश चुकता केला आहे.
या अंतरिम लाभांशाचा आरटीजीएस इंटीमेशन बँक ऍडवाईस केंद्रीय उर्जा आणि नूतनक्षम उर्जा राज्यमंत्री आणि कौशल्यविकास आणि उद्यमशीलता राज्यमंत्री आर के सिंग यांना पॉवर फायनान्स कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक रवींदर सिंग धिल्लाँ यांनी सुपूर्द केला. यावेळी उर्जा सचिव आलोक कुमार, अतिरिक्त उर्जा सचिव आशिष उपाध्याय, पीएफसीचे संचालक(व्यावसायिक) पी के सिंग, पीएफसीचे संचालक( फायनान्स) उपस्थित होते. पीएफसीच्या संचालक मंडळाच्या १२ मार्च २०२१ झालेल्या बैठकीत १० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक समभागावर ८ रुपये दराने हा अंतरिम लाभांश जाहीर करण्यात आला होता.