मुक्तपीठ टीम
देशातील चार राज्य आणि एक क्रेंद्र शासित प्रदेशात सध्या निवडणुका सुरू आहे. या निवडणुकांच्या प्रचारादरम्यान चुकीची माहिती, अफवा, द्वेषयुक्त भाषणांचा प्रसार सोशल मीडियाच्या मध्यमातून कमी करण्यासाठी फेसबुकने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत.
फेसबूकने आपल्या ब्लॉगवर एक पोस्ट करत कडक कारवाईबद्दल बजावले आहे. जे युजर्स वेळोवेळी सांगूनही नियम पाळत नाहीत, फेसबूककडून अशा अकाउंट्सना बंद केले जाईल.
फेसबूकच्या ब्लॉगनुसार, ज्या राज्यात निवडणुका किंवा आंदोलन सुरू आहेत अशा राज्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा, वादग्रस्त भाषणे असे साहित्य पसरण्याआधीच ते हटवण्यात येईल. जे फेसबूकच्या ठरवलेल्या नियमांचे पालन करणार नाही ती अकाउंट बंद करण्यात येतील.
या प्लॅटफॉर्मवरील वादग्रस्त पोस्टमुळे याआधीही मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. फेसबुकचा भाग असणाऱ्या व्हॅट्सअॅप आणि इंस्टाग्रामसाठी भारत हा खूप मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे आपल्या युजर्सना सुरक्षित आणि त्यांच्या मनात विश्वासार्हता कायम राखण्यासाठी फेसबुकने हे पाऊल उचलले आहे.