मुक्तपीठ टीम
कोरोना लस तयार करणारी फार्मा कंपनी फायजर-बायोएनटेकने दावा केला आहे की, त्यांची लस १२ ते १५ वर्षांच्या मुलांसाठी कोरोनाविरोधात १००% फायद्याची आहे. अमेरिकेत २,२५० मुलांवर झालेल्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांमध्येही ही लस १००% परिणामकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. दुसरा डोस दिल्याच्या एका महिन्यानंतर त्यांच्या शरीरात प्रतिकारशक्ती चांगलीच वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
भारतीय वंशाच्या मुलानेही घेतली लस
लसीच्या मुलांवरील चाचण्या ऑक्टोबर २०२० मध्ये सुरू झाल्या होत्या. त्याचे निष्कर्ष आता समोर आले आहेत. या लसीकरणादरम्यान भारतीय वंशाचा १२ वर्षीय अभिनवने फायजरची लस घेतली होती. तो कोरोना लस घेणाऱ्या सर्वात कमी वयांच्या मुलांपैकी एक आहे.
२ ते ५ वर्षीय मुलांवर ट्रायल्स सुरू करण्याची योजना
- कंपनीने मागच्या महिन्यात ६ महिन्यांपासून ११ वर्षापर्यंतच्या मुलांना लस घेण्यासाठी तीन टप्प्यातील चाचण्यांचा अभ्यास सुरू केला आहे.
- ५ ते ११ वर्षांच्या मुलांना पहिला डोस देण्यात आला. फायझरने पुढच्या आठवड्यापासून २ ते ५ वर्षांच्या मुलांना लस देण्याच्या तयारीत आहे.
- त्यात ४,६४४ मुलांना समाविष्ट करण्याची योजना आखली आहे. निकाल २०२१ अखेरीस अपेक्षित आहे.
- मॉडर्ना ही आणखी एक कंपनी किशोरवयीन मुले आणि मुलांवर लसीची चाचणी घेत आहे. त्यापैकी, १२ ते १७ वर्षे ते ६ महिने ते ११ वर्षे या कालावधीत मुलांवर स्वतंत्र चाचण्या घेण्यात येत आहेत.