मुक्तपीठ टीम
स्वच्छतागृह म्हटले की ते नावाप्रमाणेच स्वच्छ असावं, अशी एक रास्त अपेक्षा असते. आपल्याकडे ती क्वचितच पूर्ण होते. पण मुंबईत सुरु असलेले काही प्रयत्न स्वच्छतागृहे केवळ स्वच्छ नाही तर देखणी आणि आकर्षक बनवणारे आहेत. शिवडीतील एक स्वच्छतागृह तर रंगसंगतीनं सजलेलं आणि देखणं आहे की येणारे-जाणारे लोक पाहतच राहतात. महापालिकेची ही एक चांगली कामगिरी आहे.
शिवडीतील शिवसेनेचे तरुण नगरसेवक सचिन पडवळ यांच्या संकल्पनेतून ही स्वच्छतागृहे साकारलीत. त्यासाठी निर्मिती आर्ट्सचे प्रथमेश पाडेकर यांनी कलात्मक सजावट केली आहे. स्वच्छतागृहही कलेने सुदंर बनवता येऊ शकते तसेच रंग रूप देऊन त्यांची एक वेगळी प्रतिमा उभारता येऊ शकते हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी या अस्वच्छ असलेल्या स्वच्छतागृहाचे चित्र बदलण्याचा प्रयत्न केला आहे.
या शौचालयांमध्ये पुरुषांबरोबरच महिला आणि दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच याचे मुख्य वैशिष्ट्य हे आहे की, त्याला आकर्षक पद्धतीने रंगविण्यात तसेच त्यावर चित्र देखील काढले आहे. त्यामुळे येथून येणाऱ्या आणि जाणाऱ्या लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.
येत्या १० दिवसात या स्वच्छतागृहाचे उद्घाटन करण्यात येणार आहे अशी माहिती मिळाली आहे. या स्वच्छतागृहात येथील नागरिकांना २४ तास पाण्याची सोयही मिळेल. हे सुंदररीत्या उभारण्यासाठी पालिकेच्या एफ/दक्षिण विभागाचे अधिकारी आणि निर्मिती आर्ट्सचे प्रथमेश पाडेकर यांचे सहकार्य लाभले आहे. महानगपालिकेची स्वच्छतागृहे देखील सुंदर आणि स्वच्छ असू शकतात हे दाखवण्याचा यातून प्रयत्न आहे. नगरसेवक सचिन पडवळ यांनी सांगितले की, आमच्या प्रभागात याहून वेगवेगळ्या संकल्पना तसेच प्रकल्प आम्ही साकारू, ते तुम्हाला लवकरच पाहायला मिळतील. अशा प्रकारची स्वच्छतागृहे प्रत्येक ठिकाणी व्हायला हवीत असे ही त्यांनी आपले मत मांडत भावना व्यक्त केली.
पाहा व्हिडीओ: