Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“क्रीडा कामगिरी उंचावण्याकरिता क्रीडा विभाग, लष्कर आणि एन.सी.सी. समन्वय आवश्यक”- सुनील केदार

March 30, 2021
in सरकारी बातम्या
0
Sunil-kedar

मुक्तपीठ टीम

 

राज्याची क्रीडा विषयक कामगिरी अधिक उंचावण्याकरिता राज्य क्रीडा विभाग, लष्कर आणि एन.सी.सी.यांनी समन्वयाने काम करणे गरजेचे असल्याचे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

लष्कर आणि एन.सी.सी.यांच्यासमवेत मंत्रालयातून दृकश्राव्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी क्रीडा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरीया, सेवानिवृत ब्रिगेडीअर सुधीर सावंत, एन.सी.सी. महाराष्ट्रचे अतिरिक्त महासंचालक वाय.पी.खांडुरे यांची उपस्थिती होती.

क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार म्हणाले,ऑलंम्पिक क्रीडा स्पर्धांसह राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक देश क्रीडा क्षेत्राकडे व्यापक दृष्टीकोन ठेवून शालेय शिक्षणाबरोबर खेळाला महत्व देत आहेत. महाराष्ट्रात क्रीडा विषयक विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त सुवर्णपदके मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षक आणि त्या दर्जाच्या सुविधा निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सेवानिवृत ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांनी दिलेल्या निवेदनाविषयी बोलतांना सुनील केदार म्हणाले राज्याला क्रीडा प्रशिक्षकांची आवश्यकता आहे. लष्करातील तिन्ही दलांकडे विभागात उत्कृष्ट प्रशिक्षक आणि पायाभुत सुविधा उपलब्ध आहेत. तसेच एन.सी.सी.विभागाकडेही विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. लष्कर आणि एन.सी.सी.विभागाकडे असणाऱ्या यासुविधा राज्यातील विविध भागामध्ये उपलब्ध आहेत. या सुविधांचा राज्यातील तरुण खेळाडूंकरीता उपयोग करण्यासाठी क्रीडा विभाग, लष्कर आणि एन.सी.सी.यांचा समन्वय महत्वाचा आहे. आज झालेल्या बैठकीत सर्वांनी सकारात्मकता दर्शवली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सिंधुदुर्ग येथील क्रीडा संकुल एन.सी.सी.कडे प्रायोगिक तत्वावर देण्याविषची माहिती घेवून निर्णय घेण्यात येणार असून या ठिकाणी खेळाडूंना प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी यावेळी सांगितले.

 


Tags: SUNIL KEDARएन.सी.सीक्रीडा मंत्री सुनील केदारक्रीडा विभागलष्करसिंधुदुर्गसुनील केदारसेवानिवृत ब्रिगेडीअर सुधीर सावंत
Previous Post

महाराष्ट्रात यापुढे ८० टक्के ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठीच!

Next Post

होंडा मोटर्सचे नवीन तंत्रज्ञान, ज्यामुळे कार बनणार कोरोना व्हायरसमुक्त

Next Post
honda

होंडा मोटर्सचे नवीन तंत्रज्ञान, ज्यामुळे कार बनणार कोरोना व्हायरसमुक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!