मुक्तपीठ टीम
कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णालयांमध्ये बेडची कमतरता भासू नये यासाठी मुंबई महानगरपालिकेने यासाठी तयारी सुरू केली आहे. यासाठी खासगी रुग्णालयांची ८० टक्के बेड आणि सर्व आयसीयू बेड कोरोना रूग्णांसाठी राखीव ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पालिका आयुक्त आय.एस. चहल यांनी जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार आता लक्षणेविरहित रुग्णांना घरी पाठवले जाईल. त्यामुळे गंभीर रुग्णांसाठी जागा होतील. यामध्ये शासकीय आणि बीएमसी रुग्णालये तसेच खाजगी रुग्णालये व नर्सिंग होम पूर्णपणे तयार करण्याचे निर्देश देण्यात आले.
कोरोनाविरोधी युद्धासाठी नवे निर्देश
- सर्व रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा व व्हेंटिलेटर तपासा पीपीई किट्स, मास्क आणि व्हीटीएम किट्स भरपूर प्रमाणात साठवा.
- आवश्यकतेनुसार सुरक्षा साधने कमी पडू नयेत याची काळजी घ्या.
- वॉड वॉर रुमच्या मंजुरीनंतरच खासगी रुग्णालय कोरोना रूग्णांना दाखल करावे, वॉर्ड अधिकाऱ्यांकडे कोरोना रूग्णांना रुग्णालयात दाखल करून त्यांना बेड उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
- विशेष परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापन संचालक व मुख्य समन्वयक खासगी रुग्णालयाच्या सूचनेनुसार रुग्णांना दाखल केले जाईल.
- सर्व रूग्णालयांच्या समन्वयासाठी मनपा नोडल अधिकारी २४ तास उपलब्ध असतील.
लक्षणे नसलेल्यांना त्वरित डिस्चार्ज करा
- कोरोनाच्या गंभीर रूग्णांना त्वरित बेड मिळावे, यासाठी बेड रिकामे करणे आवश्यक आहेत.
- वैद्यकीय सुविधांवरील अनावश्यक ताण कमी करण्यासाठी लक्षणेविरहित रुग्णांसाठी नवे धोरण जाहीर केले आहे.
- आता लक्षणेविरहित रुग्णांना घरी पाठवले जाईल.
सहाय्यक आयुक्तांवर विभागातील रुग्णालयांची जबाबदारी
- आयुक्तांनी सर्व प्रभागातील सहाय्यक आयुक्तांना आपल्या प्रभागांतर्गत असलेल्या खासगी रुग्णालयांवर लक्ष ठेवावे.
- वॉर्ड वॉर रूममधून रुग्णालय व्यवस्थापन रूग्णांची भरती करीत असल्याचे सुनिश्चित करावे.
- एवढेच नव्हे तर या देखरेखीसाठी शिक्षक किंवा इतर कर्मचारी नेमले जावेत.
नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक
- सर्व खासगी रुग्णालयांच्या व्यवस्थापकांना नोडल अधिकारी २४ तास नियुक्त करण्याचे निर्देश.
- या नोडल अधिकाऱ्यांची संख्या स्थानिक वॉर्ड वॉर रूमला कळवण्यात यावी, जेणेकरून बीएमसीला वेळोवेळी आवश्यक माहिती मिळू शकेल.
फायर ऑडिट
भांडुपमध्ये मॉलच्या आगीत कोरोना सनराईझ रुग्णालयात ९ रूग्णांचा मृत्यू झाला होता. या आगीत रुग्णालयामध्ये बसविलेल्या अग्निरोधक यंत्रांनी काम न केल्याची माहिती मिळाली आहे. याची गंभीरपणे दखल घेत आयुक्तांनी सर्व खासगी कोरोना रुग्णालयांना स्ट्रक्चरल स्थिरता तपासण्यासाठी व अग्निशामक तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
No bed for covid positive patients (without symptoms) at private or govt hospitals at Mumbai as per New rule..
— Dr Rahul Ghule (@DrRahulGhule11) March 29, 2021