गुन्हे महत्वाचे: 1) संबंधित विभाग आणि शासनाची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतरीत्या कलांवतीण सुळक्यावर प्रबळगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांची दीड फूड उंचीची व १२ किलो वजनाची सिंहासनावर बसलेल्या मूर्तीची स्थापना करून स्मारकाचे उद्धाटन केल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2)बहिणीनेच भावाचा खून केल्याच्या या धक्कादायक प्रकाराने बहीण-भावाच्या पवित्र नात्याला एकप्रकारे कलंकच लावला आहे,’ असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच एका निकालात नोंदवले. पुण्यातील बावधनमधील डीएसके राणवारा सोसायटीमधील जगजितकौर निर्मलसिंग या बहिणीने जन्मठेपेच्या शिक्षेविरोधात केलेले अपिल फेटाळून लावताना न्या. साधना जाधव व न्या. निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठाने हे निरीक्षण नोंदवले. 3)पुण्यातील वारजे येथे एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत वाढदिवसाच्या पार्टीला गेली होती. या प्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. 4)तुर्भे सेक्टर-२१ भागात राहाणाऱ्या आकाश बाळासाहेब शिंदे या तरुणाचा मृतदेह तुर्भे येथील तलावात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मित्राला तुर्भे येथे सोडून बेलापूर येथे जात असल्याचे सांगून तो बाहेर पडला, मात्र गुरुवारी रात्रीपासून तो बेपत्ता झाला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह शनिवारी सकाळी तुर्भे येथील तलावात आढळून आला. आकाश तलावात पडला की त्याने आत्महत्या केली याबाबत एपीएमसी पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे. 5)दापोली तालुक्यातील मुरुडमध्ये एका पोस्ट मास्तरने आत्महत्या केल्याची घटना घडलीय. पोस्टमास्तर पूर्वी तुरे यांनी पोस्ट कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पूर्वी तुरे या मुळच्या दापोली तालुक्यातील हर्णेमधील मोठी गोडीबावच्या रहिवासी आहेत. शुक्रवारी रात्रीपर्यंत त्या घरी परतल्या नाहीत. तेव्हा तपास केला असता पोस्ट कार्यालयात त्यांनी आत्महत्या केल्याचं दिसून आलं.