मुक्तपीठ टीम
पुणे महानगरपालिकेमध्ये वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) या पदावर ५० जागा, वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस) या पदावर ५० जागा, परिचारिका (एएनएम) या पदावर १०० जागा, परिचारिक/ नर्सिंग ऑर्डली या पदावर १०० जागा, आया या पदावर १०० जागा अशा एकूण ४०० पदांवर भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, पद क्र.१ ते ३ साठी ३१ मार्च २०२१ आणि पद क्र.४ ते ५ साठी १ एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १)पद क्र.१- एमबीबीएस
२) पद क्र.२- बीएएमएस
३) पद क्र.३- i)१०वी उत्तीर्ण ii) एएनएम कोर्स
४) पद क्र.४- i)१०वी उत्तीर्ण ii)एमएस-सीआयटी
५) पद क्र.५- ८वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्षे असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.pmc.gov.in/mr वरून माहिती मिळवू शकता.