मुक्तपीठ टीम
कोरोनाविरुद्धच्या लढाईत लसीमागोमाग आता आणखी एक चांगली बातमी आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी तोंडावाटे घ्यायचे अँटी व्हायरल ओरल औषधंही लवकरच येण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील फायझर या औषध कंपनीने कोरोनासाठी ओरल अँटीवायरल ड्रगची क्लिनिकल चाचणी सुरू केली आहे. हे औषधही कोरोनावरील उपचारात प्रभावी ठरेल, असा कंपनीला विश्वास आहे. हे औषध गोळी स्वरुपात असल्यानं त्याचा वापर मोठ्याप्रमाणावर प्रभावीरीत्या करणे शक्य होणार आहे.
फायझरच्या या औषधाचे शास्त्रीय नाव पीएफ-०७३२१३३२ आहे. फायझरची कोरोना लस जगातील बर्याच देशांमध्ये वापरली जात आहे. ती ९५ टक्के प्रभावी मानली जात आहे. फायझरने दिलेल्या माहितीनुसार, ओरल अँटीव्हायरल ड्रगच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्या सुरू झाल्या आहेत. त्यांची चाचणी सध्या अमेरिकेत सुरू आहे.
मानवी पेशीमध्ये कोरोना विषाणू वाढवणाऱ्या घटकांना हे औषध रोखेल.
कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी, उपलब्ध लसींसह ही गोळीही कोरोनाविरोधातील प्रभावी शस्त्र ठरेल. कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी गोळी महत्वाची कामगिरी बजावेल. आतापर्यंतच्या चाचण्यांचे निष्कर्ष हे उत्साह वाढवणारे आहेत. फायझरचे मुख्य वैज्ञानिक अधिकारी मायकेल डॉलस्टीन यांनी म्हटले आहे की,ज्या पद्धतीने एसएआरएस-कोव्ह -२ विषाणूमध्ये बदल घडत आहेत, ते लक्षात घेऊन त्याच्याविरोधात लढण्यासाठी असे बळ आवश्यक आहेत. हे औषध रोगाची क्षमता कमी करेल आणि लोकांना रुग्णालयापासून दूर ठेवेल, हा एक खूप मोठा ठरेल.
पाहा व्हिडीओ: