Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पंढरपुरात राष्ट्रवादी-भाजपा उमेदवार ठरले, सेना-स्वाभिमानी बंडखोरीने लढत रंगणार

March 29, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
पंढरपुरात राष्ट्रवादी-भाजपा उमेदवार ठरले, सेना-स्वाभिमानी बंडखोरीने लढत रंगणार

मुक्तपीठ टीम

 

भारत भालके यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. आता लढत नेमकी कोणात होणार ते स्पष्ट होऊ लागले आहे. भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही प्रमुख पक्षांनी या पोटनिवडणुकीसाठी आपले उमेदवार आज घोषित केले आहेत. राष्ट्रवादीने दिवंगत भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भारत भालके यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपाने समाधान आवताडे यांना मैदानात उतरवले आहे.

 

राष्ट्रवादी निवडणुकीत कोणता उमेदवार उतरवणार हे पाहून त्यानंतरच आपण उमेदवार द्यायचा, अशी रणनीती भाजपनं आखली होती. मात्र, बराच काळ वाट पाहिल्यानंतरही राष्ट्रवादीनं उमेदवार जाहीर केला नाही. त्यामुळे अखेर भाजपाकडून समाधान आवताडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.

 

भाजपा उमेदवार पूर्वीचा शिवसेनेचा!

समाधान अवताडे हे बांधकाम व्यावसायात आहेत. ते सहकार क्षेत्रातही कार्यरत आहेत. मंगळवेढा तालुक्यातील संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे ते अध्यक्ष आहेत. याशिवाय ते सोलापूर येथील विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक आणि सोलापूर जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्षही आहेत. जिल्ह्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात ते त्यांच्या कामामुळे संबंधित संस्थांशी उत्तम संबंध राखून आहेत. अवताडे यांनी याआधी दोनवेळा आमदारकीसाठी प्रयत्न केला होता. २०१४ साली शिवसेनेच्या धनुष्यबाणावर लढले.  त्यानंतर ते भाजपात सक्रिय झाले. मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्याने २०१९ ला त्यांनी अपक्ष लढत देताना चांगली मते मिळवली होती.

 

राष्ट्रवादीकडून दिवंगत आमदारांचे सुपुत्र

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके यांना उमेदवारी द्यावी असे मत होते. पण त्याऐवजी राष्ट्रवादीने आता त्यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना मैदानात उतरवलं आहे. भगीरथ हे दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. ते उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

 

स्वाभिमानीची वेगळी वाट

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील आणि धनगर समाजाचे संजय माने यांनी उमेदवारी दाखल केली आहे. भाजपाविरोधातील मित्रपक्षाच्या वेगळ्या भूमिकेने राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढवली आहे.

 

शिवसेनेतून बंडाचा झेंडा

एकीकडे २०१४मध्ये शिवसेनेतून लढलेले अवताडे भाजपाच्या कमळावर लढत असताना दुसरीकडे शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुखांनीही बंडाचा झेंडा फडकवला आहे. शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख शैला गोडसे यांनी बंडाचा झेंडा फडकावत थेट गावोगावी प्रचाराला सुरुवात केली आहे. गेल्यावेळी त्यांनी उमेदवारी देण्याच्या आश्वासनावर शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र गेल्यावेळी त्यांना उमेदवारी नाकारली गेली. आता आघाडीमुळे पक्षच लढत नाही. त्यामुळे आता कार्यकर्त्यांच्या दबावामुळे त्यांनी उमेदवारी दाखल करण्याची घोषणा करीत जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. शैला गोडसे या सोलापूर जिल्हा परिषदेच्या सदस्य असून महिला वर्गात त्या चांगल्याच लोकप्रिय आहेत.


Tags: जंयत पाटीलपंढरपूर - मंगळवेढाभगीरथ भालकेभारत भालकेराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
Previous Post

लॉकडाऊनला भाजपाचा कडवा विरोध

Next Post

३१ हजारांना कोरोना, २१ हजार बरे होऊन घरी! ४८ तासात ८५ मृत्यू!!

Next Post
महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट – आज ४,७८७ नवीन कोरोना रुग्ण,  मुंबईत सर्वाधिक ७२१

३१ हजारांना कोरोना, २१ हजार बरे होऊन घरी! ४८ तासात ८५ मृत्यू!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!