मुक्तपीठ टीम
देशात पून्हा एकदा कोरोना झपाट्याने वाढत आहे. रोजच कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या छातीत धडकी भरवणारी आहे. त्यामुळे कोरोनाची ही दुसरी लाट किती मोठी असणार याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. देशातील आघाडीची बँक असणाऱ्या स्टेट बँकेच्या संशोधन विभागाने सांख्यिकी अभ्यास करुन कोरोनाची दुसरी लाट मे महिन्यापर्यंत सुरु राहण्याची शक्यता वर्तवली आहे. या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या २५ लाखांवर जाण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
स्टेट बँकेचा कोरोना अहवाल काय सांगतो?
• स्टेट बँक ऑफ इंडियाच्या संशोधन विभागाने भारतातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गासंदर्भात एक अहवाल सादर केला आहे.
• या अहवालात दुसरी लाट धोकादायक असल्याचे म्हटले आहे.
• १५ फेब्रुवारीपासून सुरू झालेली ही लाट मेपर्यंत सुरू राहू शकेल, अशी भीती व्यक्त केली आहे.
• २५ लाख लोकांना कोरोना संसर्ग होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
देशभर कोरोनाची लाट वाढतेय….
• भारतातील कोरोनाचे प्रकरणे सतत्याने वाढत आहेत.
• देशात गेल्या २४ तासांत ५९११८ नवीन प्रकरणे नोंदली गेली असून, २५७ लोक मरण पावले आहेत.
• कोरोनाच्या सक्रिय प्रकरणांची संख्या ४,२१,०६६ वर पोहोचली आहे.
• देशात कोरोना लसीकरण जोरात सुरू असून आतापर्यंत ५.५ कोटीहून अधिक लोकांना देशभरात कोरोना लस देण्यात आली आहे.
• गेल्या २४ तासात ३५,९५२ प्रकरणे महाराष्ट्रात आढळली आहेत.
• त्यातील २,६६१ पंजाब तर कर्नाटकामध्ये २,५२३ प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
• तर देशात २५७ मृत्यूंपैकी १११ लोक महाराष्ट्रात आणि ४३ पंजाबमधली आहेत.
केंद्र सरकारच्या निर्बंध सूचना
• लग्न समारंभात ५० लोक होऊ शकतात सहभागी
• कोरोनाच्या लाटेला रोखण्याठी प्रशासनांनी ज्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन जाहीर केले आहे त्या जिल्ह्यात मोर्चे, मिरवणुका, निदर्शने आणि धरण्यास बंदी घालण्यात आली आहे.
• प्रशासनाच्या परवानगीने केवळ ५० लोक लग्नात सहभागी होऊ शकतात.
• त्याच वेळी, अंत्यसंस्कारासाठी केवळ २० लोक उपस्थित राहू शकतात.
• रेस्टॉरंटमध्ये खाण्यास मनाई असेल. तथापि, आपण फूड पार्सल घेऊ शकता.
• जिम, जलतरण तलाव, सिनेमा हॉल देखील पूर्णपणे बंद असतील.
• कोरोनामुळे येऊ ठेपलेल्या होळी सणावरही निर्बंध घालण्यात आले आहे.
• या सणा दरम्यान, सांस्कृतिक-धार्मिक कार्यक्रम तसेच सार्वजनिक लंगरचे आयोजन केले जाणार नाही.
• लोकांनी आपपल्या घरी होळी साजरी करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
• खाजगी कार्यक्रमांमध्ये २०० पेक्षा जास्त लोक सहभागी होणार नाहीत.
• घरातील कार्यक्रमांमध्ये केवळ ५० टक्के लोक सहभागी होऊ शकतात.
• जिल्हा प्रशासनाच्या परवानगीने सामाजिक, धार्मिक, खेळ, करमणूक, शैक्षणिक, राजकीय किंवा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करता येतील.
• महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, भोपाळ, हिमाचल, उत्तराखंड, यूपी या राज्यातही कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत.
• काही राज्यातील जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. जेणे करून वाढत्या कोरोनाच्या आलेखाला रोखणे सोपे होईल.