मुक्तपीठ टीम
भारतीय सैन्य दलासाठी कॉम्बॉट व्हेईकल्स खरेदी करण्यासाठी सरकारने महिंद्रा डिफेन्स सिस्टम्स लिमिटेडबरोबर करार केला आहे. १,०५६ कोटी रुपये खर्च करून १,३०० लाइट कोम्बॅट व्हेईकल्स खरेदी करण्यात येणार आहेत. चार वर्षांया कालावधीत कॉम्बॉट व्हेईकल्सना भारतीय लष्करात समाविष्ट केले जाईल.
“मेक इन इंडिया” ला आणखी चालना देण्यावर भारतीय सेनादलांकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळेच संरक्षण मंत्रालयाने महिंद्रा डिफेन्स सिस्टम्स लिमिटेड बरोबर १,३०० कॉम्बॉट व्हेईकल्स पुरविण्याचा करार केला आहे. लाइट स्पेशालिस्ट व्हेईकल हे एक आधुनिक लढाऊ वाहन आहे. मीडियम मशीन गन, स्वयंचलित ग्रेनेड लॉन्चर तसेच अँटी-टँक गाइडेड मिसाइल्सच्या वाहनांसाठी विविध लढाऊ युनिट्सना परवानगी दिली जाईल, अशी माहिती मिळाली आहे. हे व्हेईकल्स स्वदेशी डिझाइन असलेले आणि महिंद्रा डिफेन्स सिस्टम्स लिमिटेडने विकसित केलेले आहे.
मंत्रालयाने म्हटले आहे की, हे व्हेईकल लहान शस्त्रास्त्रांच्या आगीपासून होणारी हानी रोखत सर्व प्रकारच्या संरक्षणासह अत्यंत चपळ आहेत. संरक्षण उद्योगातील स्वदेशी उत्पादन क्षमता दर्शविणारा हा प्रमुख प्रकल्प आहे. ‘आत्मनिर्भर भारत अभियान’ आणि ‘मेक इन इंडिया’ उपक्रमात हा आणखी एक महत्त्वाचा भाग ठरेल.
पाहा व्हिडीओ: