Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गोंडवना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. राजेंद्र कुमार शर्मा

March 24, 2021
in सरकारी बातम्या
0
Rajendra sharma

मुक्तपीठ टीम

दिल्ली आयआयटी येथे दीर्घ काळ गणिताचे प्राध्यापक असलेले तसेच सध्या स्वित्झर्लंड येथे संशोधन अध्यासन पद धारण करीत असलेल्या डॉ. राजेंद्र कुमार शर्मा यांची गडचिरोली येथील गोंडवना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी डॉ. राजेंद्र कुमार शर्मा यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

७ सप्टेंबर २०२० रोजी गोंडवना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नामदेव कल्याणकर यांचा कार्यकाळ संपल्यापासून हे पद रिक्त होते. रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रो.श्रीनिवास वरखेडी यांचेकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.

डॉ राजेंद्र कुमार शर्मा (जन्म २० नोव्हेंबर १९५८) यांनी मेरठ विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असून आयआयटी दिल्ली येथून पीएच.डी. प्राप्त केली आहे. त्यांनी फ्रान्स व जर्मनी येथे पोस्ट डॉक्टरल शिक्षण प्राप्त केले आहे. डॉ. शर्मा यांनी आयआयटी खडकपूर येथे अध्यापनाला सुरुवात केली व सन २००२ पासून ते दिल्ली आयआयटी येथे प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत.

१ जानेवारी २०१९ रोजी त्यांची स्वित्झर्लंड येथे कन्सेनसिस ब्लॉकचेन या संशोधन अध्यासनावर नियुक्ती करण्यात आली. त्यांना अध्यापनाचा ३२ वर्षांचा अनुभव असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ३२ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. केली आहे.

कुलगुरू निवडीसाठी राज्यपालांनी पाटणा व दिल्ली उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती राजेंद्र मेनन यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिति गठित केली होती. इंडियन इंस्टीट्युट ऑफ सोशल एंड इकोनोमिक चेंज, बंगलोर येथील संचालक डॉ. एस माधेश्वरन व शासनाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर या समितीचे सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ राजेंद्र कुमार शर्मा यांची कुलगुरूपदी नियुक्ती जाहीर केली.

Tags: कुलगुरूगोंडवना विद्यापीठडॉ राजेंद्र कुमार शर्मादिल्ली आयआयटीस्वित्झर्लंड
Previous Post

भाजपाकडून काँग्रेस लक्ष्य, हाताला किती हिस्सा? राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बोलते करण्याचीही मागणी

Next Post

गुन्हे महत्वाचे : 1) एकाच कुटुंबाती तीन महिलांच्या बँक खात्यातून तब्बल १ लाख ५४ हजार रुपयांची रोख रक्कम परस्पर दुसऱ्या बँक खात्यात वळती करून त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. एनआरआय पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात सायबर चोरट्यावर आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. 2)बॉलिवूड सेलिब्रिटी आणि मुंबईच्या उपनगरी भागातील ग्राहकांना ड्रग्ज पुरवणाऱ्या विद्यार्थ्याला एनसीबीने अटक केली. विद्यार्थ्याला बेड्या ठोकण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी जेव्हा घरी पोहोचले, तेव्हा त्यांना घाबरवण्यासाठी बिलंदर आरोपीने त्यांच्यावर कुत्रे सोडले. 3)नांदेडमधील पाच वर्षीय बालिकेवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात अवघ्या न्यायालयाने 64 दिवसांत शिक्षा सुनावली आहे. अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पीडितेला पळवून नेऊन अत्याचार करत खून केल्या प्रकरणी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) नुसार आरोपीवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. 4) एका महिलेची रात्रीच्या सूमारास धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली होती. दोन दिवसात या हत्येचा उलगडा करण्यात विठ्ठलवाडी पोलिसांना यश आलं आहे. एका तरुणाचे या महिलेच्या अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते. मात्र या महिलेने या प्रेम सबंधास विरोध केल्याने या तरुणाने या महिलेची गळा चिरून हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे या कटात अल्पवयीन मुलगी देखील सहभागी होती. दिलजीत यादव असं या आरोपी तरुणाचं नाव असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. तर जन्मदात्या आईच्या हत्येच्या कटात सहभागी असलेल्या 15 वर्षीय मुलीला बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. 5)पनवेल तालुक्यातील आकुर्ली भागात राहाणाऱ्या सागर चौधरी (२८) या विवाहित तरुणाने प्रेयसीच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. सागरने आत्महत्येपूर्वी प्रेयसीला व्हॉटसअॅपवर आत्महत्या करत असल्याचा मेसेज केल्याचे तपासात आढळले आहे. खांदेश्वर पोलिसांनी या प्रकरणी सुष्मिता यादव या तरुणीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!