मुक्तपीठ टीम
सध्या चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. भीती अशीही वाटते की शहरातील सिमेंटच्या जंगलात चिऊताई फक्त गोष्टींपुरतीच उरेल की काय! आपल्यापैकी बहुतेकांचे चिऊताईशी बालपणापासूनच आपुलकीचं नातं असतं. त्याच नात्यातून विजय चौधरी चिमण्यांची काळजी घेत असतात. त्यांची घटती संख्या त्यांना अस्वस्थ करत असते. त्या अस्वस्थेतेतूनच त्यांनी चिमण्यांची घरट्यांची निकड ओळखून काम सुरु केले. चिमण्यांच जतन आणि संगोपन केल पाहिजे या उद्देशाने विजय यांनी चिमण्यांसाठी घरटी बनवण्याचे काम सुरु केले आहे.
विजय चौधरी डावा तालुक्यातील पिम्प्लास गावात राहतात. आपल्या परसबागेत सुकलेले दुधी, फुटलेले चेंडू यांच्यापासून त्यांनी चिमण्यांसाठी घरटी तयार केली आहेत. तसेच विविध ठिकाणी या चिमण्यांसाठी दाणे आणि पाण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे त्यांचे घर आणि सभोतालच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात चिमणी आणि पक्ष्यांचे वास्तव्य दिसून येतं.
विजय चौधरी यांनी मुक्तपीठशी बोलताना आपला संकल्प सांगितला. ते म्हणाले, पक्षी हे माणसाचे मित्र आहेत. ते पर्यावरणाचाही समतोल राखण्यास मदत करतात. त्यांचं जतन आणि संगोपन करणे हे आपले कर्तव्य आहे. अगदी सोपं काही करावं म्हणून सुकलेल्या दुधी आणि फुटलेल्या चेंडूंपासून घरटी बनवली. ते सहज शक्य असतं. अशी बनवलेली घरटी परिसरात वाटली आहेत. त्यामुळे चिमण्यांच्या संवर्धनास मदत होईल अशी त्यांना अपेक्षा आहे.
पाहा व्हिडीओ: