Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

निवडणुका पावल्या! पेट्रोल-डिझेलचे दर वाढणेच थांबले!!

March 22, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
Petrol Diesel

मुक्तपीठ टीम

पेट्रोल-डिझेलच्या दरातत आज २३ व्या दिवशीही कोणताही बदल झाला नसून दर स्थिर असल्याने वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे. यापूर्वी २७ फेब्रुवारी रोजी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीने ऐतिहासिक पातळी गाठली होती. दरदिवशी सरकारी पेट्रोलियम कंपन्या पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. मात्र, संपूर्ण मार्च महिन्यांत पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये अद्याप कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमुळे दरवाढ टाळली जात असल्याची शक्यताय.

प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

  • मुंबईत पेट्रोल ९७.५७ रुपये प्रति लीटर तर डिझेल ८८.६० रुपये प्रति लीटर आहे.
  • दिल्लीत पेट्रोल ९१.१७ रुपये प्रति लीटर तर डिझेल ८१.४७ रुपये प्रति लीटर आहे.
  • कोलकात्यात पेट्रोल ९१.३५ रुपये प्रति लीटर तर डिझेल ८४.३५ रुपये प्रति लीटरआहे.
  • चेन्नईमधील पेट्रोल ९३.११ रुपये प्रति लीटर तर डिझेल ८६.४५ रुपये प्रति लीटर आहे.
  • बंगळुरुमध्ये पेट्रोल ९४.२२ रुपये प्रति लीटर तर डिझेल ८६.३७ रुपये प्रति लीटर आहे.

फेब्रुवारी महिन्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर १६ दिवस सातत्याने वाढविण्यात आले होते. नवीन वर्षापासून आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे दर २५ वेळा वाढले आहेत.


Tags: Petrol diesel priceपेट्रोल-डिझेलपेट्रोल-डिझेल दर
Previous Post

क्रीड थोडक्यात: १) भारत-इंग्लंड यांच्यात रंगलेल्या पाच सामन्याची टी-२० मालिका भारताने ३-२ अशी जिंकली आहे. एकीकडे विजयाचा आनंद साजरा केला जात आहे, तर दुसरीकडे भारतीय संघासाठी वाईट बातमी समोर आली आहे. शेवटच्या सामन्यात निर्धारित वेळेत भारतीय संघाने दोन षटके कमी टाकल्याने संघाच्या मानधनामधील ४० टक्के दंड आयसीसीच्या एलिच पॅनेलचे मॅच रेफरी जवागल श्रीनाथ यांनी ठोठावला आहे. तर संघाचा कर्णधार विराट कोहलीने संबंधित कारवाई मान्य केली आहे. २) युवराज सिंग आणि युसूफ पठाण आणि गोलंदाजांच्या योगदानामुळे भारत लिजंड्स संघाने श्रीलंका लिजंड्सचा १४ धावांने पराभव करत जागतिक रस्ते सुरक्षा क्रिकेट मालिकेला आपल्या नावे केली आहे. भारताने २० षटकांत ४ बाद १८२ धावाचे आव्हान दिले होते. सनथ जयसूर्याने ४३ धावा केल्या. कौशल्य वीररत्ने (३८), चिंतका जयसिंघे (४०) यांनी अखेरच्या क्षणी प्रतिकार केला तरी श्रीलंकेला ७ बाद १६७ धावाच करता आल्या. ३) यंदाचे मेक्सिकन ओपन स्पर्धेचे विजेतेपद जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या जर्मनीचा टेनिसपटू अलेक्झांडर ज्वेरेवने यांनी आपल्या नावे केला आहे. ज्वेरेवने अंतिम सामन्यात ग्रीसच्या आघाडीचा टेनिसपटू स्टेफानोस सितसिपासचा ६-४, ७-६ असा धुवा उडविला. ४) आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी ही भारतीय पुरुष आणि महिला नेमबाजी संघाने निर्विवाद वर्चस्व गाजवले असल्याचे दिसले. १० मीटर एअर पिस्तुल सांघिक प्रकारात भारताने दोन सुवर्णपदाची कमाई केली आहे. यशस्विनी सिंह देस्वाल, मनू भाकर आणि निवेथा यांच्या महिला संघाने, तर सौरभ चौधरी, अभिषेक वर्मा आणि शाहझर रिझवी यांच्या पुरुष संघाने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. ५) दिल्ली पब्लिक स्कूल येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत सीए भवानी देवीने महिलांच्या वैयक्तिक सॅबर प्रकारातील अंतिम लढतीत केरळच्या जोश्ना जोसेफला १५-७ असे पराजित केले. टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली ती भारतातची पहिली तलवारबाज असून भवानीने नवव्यांदा ही स्पर्धा जिंकण्यात विक्रम आपल्या नावे केला आहे.

Next Post

कोरोना लस घेतली? पहिल्या डोसपासून ५६ दिवस करु नका रक्तदान!

Next Post
blood donate

कोरोना लस घेतली? पहिल्या डोसपासून ५६ दिवस करु नका रक्तदान!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!