मुक्तपीठ टीम
तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत आहात? अहो मग लक्ष ठेवा. भाव घसरतच चाललेत. सोन्याची खरेदी करा. ही सोनं खरेदीची सुवर्ण संधी मानली जात आहे. सोन्याच्या आजवरच्या सर्वोच्च भावापेक्षा सोने सुमारे ११ हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे. सोन्याची किंमत सुमारे ४५ हजार रुपयांपर्यंत घसरली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याने प्रति १० ग्रॅम ५६,२०० रुपयांची विक्रमी पातळी गाठली. पण, त्यानंतर तो भाव ११,००० रुपयांनी कमी झाला आहे. आजचा मुंबईतील सोन्याचा भाव दहा ग्रॅमसाठी ४४ हजार ९१० आहे. कालपेक्षा दरात दहा रुपयांची घसरण आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये एप्रिलमध्ये वितरित झालेल्या सोन्याच्या वायद्याच्या किंमती ८५ रुपयांनी किंवा ०.१९ टक्क्यांनी वाढून ४५,०३६ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचल्या. तरीही पुढे मात्र सोनं आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे.
११ हजार रुपयांपर्यंत सोनं स्वस्त झालं:
- महत्त्वाचं म्हणजे गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोनं आतापर्यंतच्या उच्चांकावर होतं.
- गेल्या वर्षी सोन्याने ५६ हजारांपेक्षा जास्त उच्चांक गाठले.
- आता सोन्याच्या किंमतीत सुमारे ११ हजार रुपयांची घट झाली आहे.
- ज्यांना सोने खरेदी करायचे आहे त्यांच्यासाठी घसरते भाव ही एक सुवर्णसंधी आहे.
- काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की येत्या काही दिवसांत सोन्याच्या किंमतींमध्ये आणखी घट होईल.
- अशी अपेक्षा आहे की सोन्याची किंमत ३९ हजार रुपयांवर घसरेल.
सोन्याचे भाव का घसरत आहेत:
- काही तज्ञांचे मत आहे की अमेरिकन डॉलर मजबुत होण्याची शक्यता आणि यूएस ट्रेझरी यिल्टमधील वाढ सोन्याच्या किंमतींवर परिणाम करीत आहे.
- यामुळेच जगासह देशात सोन्याचे दर घसरत आहेत. अशा परिस्थितीत सोन्याची किंमत ३९ हजार रुपयांवर घसरण्याची शक्यता आहे.
ग्रम
२४ कॅरेट सोन्याचे भाव
आज काल फरक
१ ग्रम ४,४९१ रुपये ४,४९२रुपये ८ ग्रम ३५,९२८रुपये ३५,९३६ रुपये १० ग्रम ४४,९१०रुपये ४४,९२०रुपये