मुक्तपीठ टीम
राज्याचे पर्यटन व शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. ट्विटरच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांनी ही माहिती दिली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी,असं आवाहन त्यांनी केलं आहे.
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या. असं त्यांनी आवाहन केलं आहे.
राज्यातील कोरोना संसर्ग अतिशय वेगाने वाढत आहे. सामान्य नागरिकांपासून ते अगदी सेलिब्रेटीसह मंत्र्यांपर्यंत कोरोनाचा संसर्ग होत आहे. आता राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.त्यामुळे चिंता वाढली असून कोरोनाची लागण झालेले आदित्य हे ठाकरे कुटुंबातील पहिलेच सदस्य आहेत.
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे तीन दिवस होते ताडोबा दौऱ्यावर
- राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर आदित्य ठाकरे दौऱ्यावर होते.
- ते १५ ते १७ मार्च अशा तीन दिवसांच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या दौऱ्यावर होते
- आदित्य ठाकरे यांचा हा दौरा पूर्णत: खासगी होता.
- या दौऱ्यात ताडोबात त्यांच्यासोबत आणखी कोण होते? याची माहिती मिळू शकलेली नाही.
- एका रिसोर्टमध्ये त्यांचा मुक्काम होता.
- या दौऱ्याबाबत जास्त माहिती देण्यात आली नव्हती