Friday, April 24, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“महाराष्ट्रात कोरोना संसर्ग थांबविण्यासाठी लसीकरणावर भर द्यावा”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सूचना

March 21, 2021
in घडलं-बिघडलं
0
haffkin

मुक्तपीठ टीम

लस संशोधनाचा वारसा असणाऱ्या हाफकिन संस्थेने यापुढील काळात नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करत वेगवेगळया आजारांवरील लसींबाबत संशोधनावर भर द्यावा. सध्याची राज्यातील परिस्थिती पाहता कोरोना प्रतिबंधक लस उत्पादनामध्ये हाफकिन इन्स्टिट्यूटने पुढाकार घ्यावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज परळ येथील हाफकिन इन्स्टिटयूटला भेट दिली. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.नितीन करीर, वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संदीप राठोड, हाफकिन इन्स्टिटयूटच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. उषा पद्मनाभन यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले की, कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. गेल्या वर्षीप्रमाणे आता देखील संसर्गाला रोखण्यासाठी अतिशय काटेकोर पावले उचलण्यात येत आहेत. कोरोना लसीकरणाला राज्यात गती देण्यात आली असून पुढील काळात हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. कोरोना लसनिर्मितीद्वारे हाफकिन इन्स्टिट्यूट यामध्ये मोलाचा सहभाग नोंदवू शकते. येणाऱ्या काळात हाफकिन संस्थेचे स्वत:चे असे ‘जैव वैद्यकीय संशोधन केंद्र’ स्थापन करण्यासाठी केंद्र शासनाची मदत घ्यावी. हाफकिन संस्थेने केलेले संशोधन लस, औषध निर्मितीकरीता येणाऱ्या काळात हाफकिन महामंडळाकडे देणे आवश्यक आहे, असेही ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशन आणि हैदराबाद येथील भारत बायोटेक यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत कोरोना लसीचे उत्पादन करण्यात येणार असून त्यासाठी १५४ कोटी रुपये खर्चाचा नवीन उत्पादन प्रकल्प मुंबईत सुरु करण्याचे नियोजन केले आहे. देशातील काही राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अधिकाधिक लसीकरण केंद्रांना परवानगी मिळावी, लसीकरणाचा वेग वाढवता यावा याकरिता हाफकिनला लस उत्पादन करण्याची मान्यता मिळणे आवश्यक असून त्यासाठी केंद्र शासनाकडे तातडीने पाठपुरावा करण्यात यावा. उत्कृष्ट दर्जाच्या लस निर्मिती व पुरवठा करण्यावर भर देताना येणाऱ्या काळात हाफकिनने औषध निर्माण करण्याबरोरबच कोरोना लस निर्मितीसाठी आयसीएमआर व भारत बायोटेक लिमिटेडकडून कोरोना लसीच्या तंत्रज्ञानाचे हस्तांतरण लवकरात लवकर करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश दिले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, हाफकिन बायो फार्मासिटीकल कॉर्पोरेशन लिमिटेड यांना मिशन कोरोना सुरक्षेअंतर्गत लसीची टेक्नॉलॉजी हस्तांतरण करण्यासाठी आयसीएमआरच्या मार्गदर्शनाने परवानगी मिळाल्यास लस प्रत्यक्ष उत्पादित करता येईल. किंवा फील- फिनिश ( Fill & Finish) बेसिसवर हाफकीनला काम करता येईल, यामधून १२६ लाख कोरोना लसी हाफकिनमार्फत उत्पादित होऊ शकतात असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

हाफकिन महामंडळाच्या परळ आणि पिंपरी येथे उत्पादन सुविधा उपलब्ध असल्याने कोरोना लसीबाबत अनुषंगिक कामे सूरु करण्यात यावीत. हाफकिन महामंडळाच्या पोलिओ लस उत्पादन सुविधेची असलेली वार्षिक उत्पादन क्षमतेबरोबरच कोरोना लसींचा निर्मिती आणि पुरवठाही वाढविण्यात यावा. परळ येथील हाफकिन संस्थेत कालमर्यादेत प्रयोगशाळा उभारण्यासाठी उपलब्ध असणारी जमीन, लस तयार करण्यासाठी आवश्यक असणारा खर्च, तज्ञ मनुष्यबळाची तरतूद या सगळया बाबी तपासून घ्याव्यात. हाफकिनमार्फत एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ पर्यंत अंदाजे १२ कोटी ६० लाख लस निर्माण करण्याची क्षमता आहे. सध्या भारत बायोटेकशिवाय इतर लस तयार करणाऱ्या उत्पादकांबरोबरही प्राथमिक बोलणी करण्यात यावी, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

पहिल्या टप्प्यात भारत बायोटेक यांच्याकडील ‘कोवॅक्सिन’ लस ठोक स्वरुपात घेण्यात येणार असून ती हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनमार्फत रिपॅकिंग व फिलिंग करून आवश्यकतेनुसार उपलब्ध करुन देण्यात येईल. हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनमार्फत कोरोना लसीची गरज असेल तोपर्यंत हे उत्पादन सुरु ठेवण्यात येईल. त्यानंतर या प्रकल्पामधून श्वान दंशावरील लस विकसित करुन या लसीचे उत्पादन घेण्यात येईल किंवा वेळीवेळी लागणाऱ्या अन्य लसींच्या उत्पादनासाठी या प्लांटचा उपयोग करण्यात येईल. ठोक स्वरुपात कोरोना प्रतिबंधक लस पुरविण्यासंदर्भात केंद्र शासनाला सविस्तर प्रस्ताव तातडीने पाठविण्यात येणार आहे.

 


Tags: Haffkine Instituteहाफकिन इन्स्टिटयूटहाफकिन बायो फार्मासिटीकल कॉर्पोरेशन लिमिटेड
Previous Post

भारताच्या कोवॅक्सिन लसीला तीन देशांची मान्यता

Next Post

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोना

Next Post
Aditya_Thakrey

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!