मुक्तपीठ टीम
देशात पहिल्यांदाच आता हाडांना जोडण्यासाठी थ्री-डी मॉडेल इम्प्लांटचे तंत्रज्ञान शोधण्यात आले आहे. या तंत्रज्ञानानुसार रॉड, प्लेट किंवा इतर धातूची रचना असलेल्या मॉडेलचा वापर करण्यात येतो. कॉन्सिल ऑफ सायन्टिफिक अॅन्ड इंडस्ट्रियल रिसर्चच्या अडवांस्ड मटेरियल्स अॅन्ड प्रोसेस रिसर्च इंस्टीट्यूट यांनी हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. स्टील किंवा टायटॅनियमसह १% कार्बन आधारित धातू म्हणजेच ग्रॅफीन मिसळून या इम्प्लांट मॉडेलला ४० टक्क्यांहून अधिक मजबूत बनले आहे. हे इम्प्लांट मॉडेल हलके असल्याने तुटलेल्या हाडांना मजबूत ठेवण्यास याचा जास्त फायदा होईल.
हे इम्प्लांट मॉडेल हाडाप्रमाणे कार्य करेल. ते सध्या स्टील किंवा टायटॅनियमपासून बनविलेले आहेत. ग्रॅफिन हा फार महागडे धातू नसल्याने, त्याच्या किंमतीत कोणताही फरक होणार नाही. याची किंमत कमी होणे देखील अपेक्षित आहे. ग्रॅफिनचे सर्जिकल उपकरणे देखील तयार केली जाऊ शकतात. ग्रॅफिनच्या वापरामुळे संसर्गाची कोणतीही शक्यता नसते कारण ग्रॅफीन हे इतर जीवाणूंसाठी ब्लेडसारखे कार्य करते.
यामुळे जीवाणूंचे अस्तित्व नाहीसे होते. धातूंपेक्षा हे धातू कशा पद्धतीने कार्य करते याची चाचणी संशोधनादरम्यान सूक्ष्म आणि नॅनो-स्केल पद्धतीने केली गेली. त्यानंतरच, थ्रीडी मॉडेलचे हे तंत्र विकसित केले गेले. याला अॅडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग म्हणतात. हे थ्री-डी प्रिंटिंगच्या पुढचे तंत्रज्ञान आहे.
इम्प्लांटचे थ्री-डी तंत्रज्ञान विकसित करणारा भारत तिसरा देश आहे. आतापर्यंत जगात हे तंत्रज्ञान अमेरिका आणि चीनकडे होते. आता भारतातही हे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. एम्प्री व्यावसायिक वापरासाठी कंपन्यांचा शोध घेत आहे. लवकरच पेटंटसाठी अर्ज करेल. हे करणारा भारत जगातील पहिला देश असेल.
पाहा व्हिडीओ: