Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नांदेडमधील कौठा येथे उभारणार अत्याधुनिक सुविधायुक्त क्रीडा संकुल

पालकमंत्री अशोक चव्हाण यांची माहिती

March 18, 2021
in सरकारी बातम्या
0
Ashok_Chavan

मुक्तपीठ टीम

 

नांदेडमधील क्रीडापटूंना आंतरराष्ट्रीय दर्जाची कामगिरी बजावता यावी, यासाठी सराव करण्याची सुविधा मिळण्यासाठी कौठा येथे जिल्हा क्रीडा संकुल उभारण्यासाठी २५ एकर जागा  उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

क्रीडा संकुल उभारण्यासंदर्भात पालकमंत्री चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच मुंबईत झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महानगरपालिका आयुक्त सुनील लहाने, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, किशोर पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी प्रस्तावित क्रीडा संकुलाच्या प्राथमिक आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले.

अशोक चव्हाण म्हणाले, जिल्ह्यातील खेळाडूंना सर्वच खेळांसाठी आधुनिक सुविधा असलेले क्रीडांगण मिळावे, यासाठी कौठा येथे क्रीडा संकुल उभारण्यात यावे. या संकुलात मैदानी तसेच इनडोअर खेळांसाठीच्या सुविधा निर्माण कराव्यात. हे क्रीडा संकुल स्वखर्चावर चालविले जावे, यासाठी नियोजन करावे. तसेच क्रीडांगणाच्या खर्चासाठी केंद्र व राज्य शासनाकडून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

जिल्हाधिकारी इटनकर यांनी क्रीडा संकुलाच्या प्राथमिक आराखड्याचे सादरीकरण केले. या संकुलात ॲथलेटिक ट्रॅकसह बॅडमिंटन, स्केटिंग, जलतरण अशा विविध क्रीडा प्रकारांसाठी सुविधा निर्माण केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.

 

कसे असेल क्रीडा संकुल

आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिन्थेटिक ॲथलेटिक ट्रॅक, प्रेक्षकांसाठी पॅव्हिलियन, बहुविध खेळांचे बहुउद्देशीय बंधिस्त क्रीडांगण असणार. यामध्ये बँडमिंटन, बास्केटबॉल, व्हॉलिबॉल, हँडबॉल, जुडो-कराटे, नेटबॉल, टेबल टेनिस, कुस्ती, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, जिमनॅस्टिक व स्कॅश आदी खेळांचा सराव करता येणार.

त्याचबरोबर या क्रीडा संकुलात ऑलंपिकच्या दर्जाचा जलतरण तलावही असणार आहे. याशिवाय तारांकित दर्जाची राहण्याची सुविधा, मोठे स्क्रिन, मल्टिकझिन कॅफेटेरिया, दुकाने, लहान मुलांसाठी मनोरंजनात्मक सुविधांचाही समावेश या क्रीडा संकुलात होणार आहे.


Tags: कौठाक्रीडा संकुलनांदेड
Previous Post

“नारवट येथील वनपर्यटन केंद्राचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करा” – अशोक चव्हाण

Next Post

कोरोनाची उसळी…आज २५हजार+! पुणे ५ हजाराकडे, नागपूर ४ हजाराकडे, मुंबई, नाशिक ३ हजाराकडे!

Next Post
महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट – आज ४,७८७ नवीन कोरोना रुग्ण,  मुंबईत सर्वाधिक ७२१

कोरोनाची उसळी...आज २५हजार+! पुणे ५ हजाराकडे, नागपूर ४ हजाराकडे, मुंबई, नाशिक ३ हजाराकडे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!