महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: बुधवार, १७ मार्च २०२१ आज राज्यात २३,१७९ नवीन रुग्णांचे निदान. आज ९,१३८ रुग्ण बरे होऊन घरी राज्यात आजपर्यंत एकूण १,५२,७६० सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २१,६३,३९१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९१.२६ % एवढे झाले आहे. राज्यात आज ८४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर २.२४ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७८,३५,४९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २३,७०,५०७ (१३.२९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,७१,६२० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,७३८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.