मुक्तपीठ टीम
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या स्फोटके असलेल्या गाडीच्या प्रकरणात आता राजकारण जास्तच पेटू लागले आहे. वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर भाजपाने आघाडी सरकारवरील हल्ला वाढवला असतानाच आता काँग्रेसनेही भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले आहे.
स्फोटकांसाठी वापरलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात सीडीआरचा मुद्दा खूप गाजला. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सीडीआर म्हणजेच कॉल रेकॉर्ड डिटेल्सच्या आधारे पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर आरोप केले होते. आता त्याच ‘सीडीआर’वरून काँग्रेसनं फडणवीसांना लक्ष्य केले आहे.
सन्माननीय विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis यांनी CDR ची माहिती तपास यंत्रणांकडे द्यावी व गुन्हेगारांना शासन करण्यास मदत करावी. नागरिक म्हणूनही तपास यंत्रणांना स्त्रोत सांगणे त्यांचे कर्तव्य आहे. CDR मिळवणे हा गुन्हा आहे. काही दिवसांपूर्वी क्राईम ब्रांचने CDR racket उघडकीस आणले होते pic.twitter.com/lEDc3LnPdm
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) March 16, 2021
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीट करून सीडीआरचा मुद्दा उपस्थित केला आहे. “देवेंद्र फडणवीस यांनी CDR ची माहिती तपास यंत्रणांकडे द्यावी व गुन्हेगारांना शिक्षा करण्यास मदत करावी. नागरिक म्हणूनही तपास यंत्रणांना स्त्रोत सांगणं त्यांचं कर्तव्य आहे,” असं सावंत यांनी म्हटलं आहे.
Leaders must set example before ppl. There can’t be one law for common man & another for leaders. The pertinent Qn must not be suppressed with louder voice in Assembly. Feel confident that Hon’ble LOP who had been CM himself will definitely think over this. It’s a request as well
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) March 16, 2021
“सीडीआर मिळवणं हा गुन्हा आहे. काही दिवसांपूर्वी क्राईम ब्रँचने सीडीआर रॅकेट उघडकीस आणले होते, असे सांगून, फडणवीस यांच्यावर गुन्हा केल्याचा आरोप सावंत यांनी अप्रत्यक्षपणे केला आहे. त्यासाठी त्यांनी काही बातम्याही जोडल्या आहेत.
फडणवीस यांना सावंत यांनी टोमणाही मारला आहे. ते म्हणतात, “नेत्यांकडून जनतेने योग्य आदर्श घेतला पाहिजे. सर्वसामान्यांना एक न्याय व नेत्यांना दुसरा न्याय योग्य नाही. कायदा सर्वांसाठी समान आहे. विधिमंडळात मोठ्या आवाजात प्रश्न दबता कामा नये. स्वतः मुख्यमंत्री राहिलेले विरोधी पक्षनेते याचा निश्चित विचार करतील हा विश्वास आहे व विनंतीही आहे.”