मुक्तपीठ टीम
मोटोरोला कंपनीने जी सिरीजच्या अंतर्गत भारतीय बाजारात मोटो जी-१० आणि मोटो जी३० हे दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहे. हे स्मार्टफोन मिडरेंजमध्ये लॉन्च करण्यात आले आहेत. मोटो जी-१० पॉवरमध्ये ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे, तर मोटो जी ३० हा स्मार्टफोन ६४ मेगापिक्सलच्या कॅमेरऱ्यापेक्षा कमी आहे. या मोटोरोलाचे दोन्ही नवे स्मार्टफोन वॉटरड्रॉप स्टाईल डिस्प्ले नॉच आणि एंडरॉईड ११ ऑपरेटींग सिस्टमच्या सोबत येतात. या दोन्ही स्मार्टफोनच्या स्पेशिफिकेशन आणि किमंती जाणून घेवूया.
मोटो जी ३० चे स्पेशिफिकेशन
डिस्प्ले- ६.५० इंच(७२०x१६००)
प्रोसेसर-क्वालकोम स्नॅपड्रॅगन ६६२
ओएस- अॅंड्रॉइड११
फ्रंट कॅमेरा-१३ एम पी
रेअर कॅमेरा-६४एम पी+८एस पी+२एम पी+२एम पी
रॅम-४ जीबी
स्टोरोज-६४ जीबी
बॅटरी-५०००एमएएच
मोटो जी-१० पॉवरचे स्पेसिफिकेशन
डिस्प्ले- ६.५१ इंच(७२०x१६००)
प्रोसेसर-क्वालकोम स्नॅपड्रॅगन ६६२
ओएस- अॅंड्रॉइड११फ्रंट
कॅमेरा-८ एम पी
रेअर कॅमेरा-४८एम पी+८एस पी+२एम पी+२एम पी
रॅम-४ जीबी
स्टोरोज-६४ जीबी
बॅटरी-६०००एमएएच
मोटो जी १० पॉवर स्मार्टफोनच्या ४ जीबी आणि ६४ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरीएंटची किंमत भारतात ९,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे.हे स्मार्टफोन ऑरोरा ग्रे आणि ब्रीज ब्लू या दोन कलरमध्ये उपलब्ध आहेत. मोटोरोला कंपनीच्या या स्मार्टफोनची विक्री १६ मार्चला दुपारी १२ वाजल्यापासून फ्लिपकार्टनवर सुरू करण्यात येईल. तसेच, मोटो जी३०च्या ६४ जीबी इंटरनॅशनल स्टोरेज असणाऱ्या वेरीएंटची किंमत भारतात १०,९९९ रुपये ठेवण्यात आली. आहे.हा फोन डार्क पर्ल आणि पेस्टल स्काय या दोन कलरमध्ये उपलब्ध आहे.
रीयलमी,रेडमी,व्हिवो,ओपो,सॅमसंग या कंपन्यांशी स्पर्धा
मोटोरोला कंपनीची रीयलमी,रेडमी,व्हिवो,ओपो,सॅमसंग या कंपन्यांशी स्पर्धा आहे.तसेच,बजेट सेगमेंटमध्ये सॅमसंग गॅलेक्सी एम२१ या फोनला टक्कर देवु शकतो. सॅमसंग गॅलेक्सी एम२१ स्मार्टफोनमध्ये ६जीबी रॅम देण्यात आला आहे. तसेच यामध्ये ट्रीपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे,ज्यामध्ये ४८ एमपीचा प्रायमरी कॅमेरा आणि सेल्फीसाठी २० एमपीचा फ्रंट कॅमेरा,पंच होल्ड डिस्प्लेसोबत देण्यात आला आहे.फोनची मेमरी ५१२ जीबी पर्यंत एक्सपेंडेबल आहे.या फोनमध्ये ६००० एमएएचची पॉवरफुल बॅटरी देण्यात आली आहे.