मुक्तपीठ टीम
आपला भारत देश १५ ऑगस्ट २०२२ ला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणार असून भारत सरकारने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय पद्धतीने स्वातंत्र्य दिवसाची ७५ वर्ष साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी स्वागत केले आहे.
या कार्यक्रमातंर्गत होणाऱ्या या कार्यक्रमाची संकल्पना आज ७५ वर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज १२ मार्च २०२१ ला निश्चित करण्यात आली याचा आनंदही शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या संबंधित सर्व कार्यक्रमांचे भारताच्या सर्व राज्यात आणि संघ राज्याच्या क्षेत्रामध्येसुध्दा आयोजन केले जाणार आहे. आपल्या देशाची मान उंचावणाऱ्या या महोत्सवाचा हिस्सा बनण्याचा मला गौरव वाटत आहे असेही शरद पवार म्हणाले.
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आपले सर्वस्व अर्पण करणार्या सर्व स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्मांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत या अभियानाला शरद पवार यांनी शुभेच्छाही दिल्या आहेत.