मुक्तपीठ टीम
पनवलेमधील पत्रकार संजय कदम हे एका अविस्मरणीय अनुभवाचे साक्षीदार झाले. पनवेलमध्ये करोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रोज वाईट बातम्या कानावर येत असतात. पण काही चांगल्या घटना दिलासाही देतात. अशीच एक घटना ९५ वर्षांच्या पोहरी सिंग या पणजोबांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याची आहे. अवघ्या १४ दिवसांत योग्य ते उपचार घेतल्यानंतर त्यांना कळंबोली मधील कोरोना सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.त्यावेळी डॉक्टर आणि त्यांच्या टीमने टाळ्या वाजवून त्यांना निरोप दिला.
पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील खांदा वसाहतीत राहणार्या या वयोवृद्ध व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यासोबत कुटुंबातील एका व्यक्तीला संसर्ग झाला होता. उपचारांसाठी त्यांना कळंबोली मधील कोरोना सेंटर मध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर व्यवस्थित उपचार झाले. त्यातही त्यांनी स्वत:ही उपचारांना चांगली साथ दिली. त्यामुळे अवघ्या १४ दिवसात ते घरी परतू शकले.
कळंबोली कोरोना सेंटरमधून ते कोरोनामुक्त होऊन घरी जात असताना त्या ठिकाणी असलेले डॉक्टर आणि कर्मचार्यांनी त्यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले. त्यांचे मनोबल वाढवणारा निरोप दिला.
स्थानिक नगसेवक रवींद्र भगत यांनी आवाहन केले आहे की, कोरोनाला घाबरुन जाऊ नका कोरोनाचा संसर्गमुळे आपल्या जीवाला धोका होतो. त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त आपला जीव भीतीपोटी जात आहे. त्यामुळे कोरोनाला घाबरुन न जाता महाराष्ट्र सरकारने जे निर्बंध दिलेले आहेत त्याचे तंतोतंत पालन करुन आपल्या मनातील भीती आहे, ती पूर्णपणे बाहेर काढून टाका. कोरोना हा संसर्गजन्य रोग असला तरी तो बरा होऊ शकेल असा रोग आहे. तो आपल्या आयुष्यात राहणार आहे आणि त्यासोबत आपल्याला जगायचं सुद्धा आहे. आज जर पोहरी सिंग ह्या ९५ वर्षाचा हा यंग स्टार कोरोनावर मात करु शकतो, तर आपल्या मनातील भीती निघाली तर शंभर टक्के बाधित पूर्णपणे बरे होऊ शकतात.
पाहा व्हिडीओ: