मुक्तपीठ टीम
अलीकडेच, मध्य प्रदेशातील ९० वर्षीय आजीने तिच्या ड्रायव्हिंग कौशल्याने सोशल मीडियावर तुफानी अंदाज दाखवला आहे. मारुती ८०० गाडी चालतानाचा साडी नेसलेल्या या आजीचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. त्या आजीने केवळ सोशल मीडियातील युजर्सचेच नाही तर नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहाण यांचेही लक्ष वेधून घेतले. त्यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर केला आणि म्हटले, ‘आजीने आपल्या सर्वांना प्रेरणा दिली आहे, की कोणतेही स्वप्न पूर्ण करायला वयाचे बंधन नसते. तुमचे वय कितीही असो, तुम्हाला आयुष्य जगण्याची आवड असली पाहिजे!’
आजीने आपल्या सर्वांना दाखवून दिले आहे की, वय तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या इच्छा पूर्ण करण्यापासून रोखू शकत नाही. वय हा फक्त एक आकडा आहे, तुमचे आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला उत्कटतेची गरज आहे. ९० वर्षांच्या रेशम बाई तंवर देवास जिल्ह्यातील बिलावली परिसरातील रहिवासी आहेत. त्यानी सांगितले की, “कार चालवायला शिकण्यामागचे कारण म्हणजे त्यांची मुलगी आणि सूनेसह त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना गाडी चालवायला येते. तसेच त्यांनी सांगितले की मला ड्रायव्हिंग आवडते. माझ्याकडे कार आणि ट्रॅक्टर आहेत.”
#वाह_दादी_वाह….
#देवास जिले के बिलावली की रहने वाली
90 साल की #दादी रेशम बाई तंवर ने इस उम्र में कार चलाना सीखा और अब हाईवे पर भर रहीं हैं फर्राटे…. pic.twitter.com/UyRVyB2nz6— Sandeep Singh संदीप सिंह ‘सहर’ (@SINGH_SANDEEP_) September 23, 2021
कौतुकाबरोबरच कुजकटपणाही…ड्रायव्हिंग लायसन्स आहे का?
- त्यांच्या ड्रायव्हिंग कौशल्याची प्रशंसा करत हा व्हिडीओ ट्विटरवर अनेकांनी शेअर केला आणि पसंत केला.
- अनेकांनी असा प्रश्न देखील उपस्थित केला की, त्याच्याकडे अशा सार्वजनिक रस्त्यावर कार चालवण्यासाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स आहे का?
- मध्य प्रदेशच्या परिवहन विभागाच्या म्हणण्यानुसार, कायमस्वरुपी ड्रायव्हिंग लायसन्स २० वर्षांसाठी किंवा ५० वर्षांच्या वयापर्यंत जे आधी असेल ते जारी केले जाते.
- दुसरीकडे, व्यावसायिक वाहनांसाठी जारी केलेल्या कायम ड्रायव्हिंग लायसन्सचे दर तीन वर्षांनी नुतनीकरण करणे आवश्यक आहे.