मुक्तपीठ टीम
कोरोना लसीकरण मोहिमेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारी पोस्टर्स लावल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे. या प्रकरणात, अनेक जिल्ह्यांमध्ये १० गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
कल्याणपुरी येथून चार पोस्टर लावणाऱ्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आम आदमी पार्टीचे नगरसेवक धीरेंद्र कुमार यांच्या सांगण्यावारून हे लोक सर्वत्र पोस्टर्स लावत होते. पोलीस म्हणाले की, कुमार यांच्या भूमिकेचाही तपास केला जात आहे. आपचे नगरसेवक धीरेंद्र कुमार म्हणतात की, त्यांना याबद्दल काहीच कल्पना नव्हती. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांना ही माहिती मिळाली होती की, काही पोस्टर्स दिल्लीच्या अनेक भागात लावण्यात येत आहेत. त्या पोस्टर्सवर पुढील शब्द आहेत, “नरेंद्र मोदीजी, आमच्या मुलांची लस परदेशात का पाठविलीत?”
These poster’s are placed in many parts of Delhi. Hope that our Primer Minister Mr. @narendramodi or Health Minister @drharshvardhan or Foreign Minister @BJP4India Mr. @DrSJaishankar or @BJP4India @BJP4Delhi @sambitswaraj @JPNadda or anyone else will give the answer of this. 👎 pic.twitter.com/V5SPW5Ukah
— Prashant Soni (@JournalistPsoni) May 11, 2021
दिल्ली पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार सर्व जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आणि बीट स्टाफला सतर्क केले गेले आहे. आतापर्यंत १० एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. तक्रारीच्या आधारे आणखी गुन्हे दाखल केले जात आहेत.
ईशान्य जिल्ह्यातही तीन एफआयआर दाखल करण्यात आल्या असून उत्तर प्रदेशात दोन जणांना अटक करण्यात आली आहे. तर उत्तरेकडील जिल्ह्यात एफआयआर आणि एक अटक, द्वारकामध्ये एक एफआयआर आणि दोन अटक, रोहिणीमध्ये दोन एफआयआर, आणि मध्य आणि पश्चिम जिल्ह्यात एक-एक एफआयआर नोंदविण्यात आल्या आहेत.
अतिरिक्त डीसीपी (पूर्व जिल्हा) संजय सेहरावत म्हणाले की, “गस्ती घालणाऱ्या पथकाने कल्याणपुरी येथून दिलीप लाल (३५), शिवम दुबे (२७), राहुल त्यागी (२४) आणि राजीव कुमार (१९) या चार जणांना अटक केली आहे.
दिल्ली पोलिसांची गुन्हे शाखा, भारतीय युवा कॉंग्रेसचे (आयवायसी) प्रमुख श्रीनिवास बिवी यांच्याशी चौकशीसाठी त्यांच्या कार्यालयात पोहोचली. कोरोना साथीच्या आजारामुळे श्रीनिवास गेल्या अनेक दिवसांपासून लोकांना मदत करत आहेत. ‘कोरोनाच्या औषधांचे अवैध वितरण’ याबाबत गुन्हे शाखेने त्यांच्यावर प्रश्न केले आहे. रूग्णालयात रूग्णांना, ऑक्सिजन सिलिंडर्स, औषधे आणि रुग्णवाहिका सेवा पोहोचवण्यासाठी आणि शेकडो विनंत्या हाताळण्यासाठी आयवायसीने आपल्या कार्यालयात युद्ध कक्ष स्थापन केले आहे.