मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ज्या प्रमााणात रुग्णांची संख्या वाढत आहे, त्याबद्दल केंद्र सरकारने चिंता व्यक्त करत राज्यांना इशाराही दिला आहे. केंद्राने म्हटले की, कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असून काही राज्यांमध्ये सातत्याने कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. तसेच ही संपूर्ण देशासमोर उद्धवलेली समस्या आहे त्यामुळे कोणीही दुर्लक्ष करु नेय असे ही केंद्र सरकारने म्हटले आहे.
कोरोनाचा सर्वात जास्त प्रादुर्भाव असणाऱ्या देशातील १०जिल्ह्यांपैकी ८ जिल्हे हे महाराष्ट्रातील आहेत. आरोग्य सचिव राजेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे (५९,४७५), मुंबई (४६,२४८), नागपूर (४५,३२२), ठाणे (३५,२६४), नाशिक (२६,५५३), औरंगाबाद (२१,२८२), बेंगळुरू (१६,२५९), नांदेड (१५,१७१), दिल्ली (८,०३२) आणि अहमदनगर (७,९५२) येथे सर्वाधिक कोरोनाची प्रकरणे आढळून आली आहेत.
महाराष्ट्राचा पॉझिटिव्ह दर सर्वात जास्त
- आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात आणि दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांत कोरोनाची नवीन प्रकरणे वाढत आहेत.
- तसेच काही राज्यांमध्ये पॉझिटिव्हचे रुग्णांचेप्रमाण भारताच्या सरासरीपेक्षा जास्त आहे.
- भारताचा सरासरी पॉझिटिव्ह दर हा ५.६५% आहे.
- महाराष्ट्रात २३.४४%, पंजाबमध्ये ८.८२%, छत्तीसगडमध्ये 8.२4% आणि मध्य प्रदेशात 7.82% दराने संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत.
देशातील कोरोनास्थिती
- गेल्या २४ तासांत देशात ५३,१२५ नवीन प्रकरणे आढळली आहेत.
- ४१,२१७ रूग्ण बरे झाले असून ३५५ जणांचा मृत्यू झाला आहे.
- आतापर्यंत देशातील सुमारे १.२१ कोटी लोकांना लागण झाली असून सुमारे १.१४ कोटी रुग्ण बरे झाले आहेत.
कोरोनाची प्रकरणे वाढण्याची मुख्य कारणे
- बहुतेक राज्यात आयसोलेशन योग्य प्रकारे होत नसून लोकांना घरील आयसोलेट किंवा क्वारंटाईन करण्याचे सांगितले जाते. पण त्यांचीवर योग्यपद्धतीने निरिक्षण ठेवले जात नाही.
- तसेच ज्या गतिने कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत, त्या वेगाने चाचण्या केल्या जात नाही आहे.
- तसेच रुग्णांच्या संपर्क आलेल्यांचा शोध घेतला जात नाही आहे.
- मुख्य म्हणजे लोकांकडून कोरोनाच्या नियमांचे पालन केले जात नाही आहे.