मुक्तपीठ टीम
कोरोना महामारीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता रोखण्यात आला आहे. सध्या महागाई भत्त्यावर असलेली स्थगिती उठवली तर मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांना महाभाई भत्त्याचे तीन हप्ते एकाचवेळी दिले जातील, अशी अपेक्षा आहे. यामुळे त्यांच्या पगारामध्ये मोठ्या प्रमाणत वाढ होणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना थकबाकीचीही चिंता सतावत आहे. सरकारशी बोलणी करून काही मार्ग निघतो का, याचा प्रयत्न कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या नेत्यांकडून केला जात आहे.
अर्थ मंत्रालय मार्ग काढणार
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या संयुक्त समितीचे नेते अर्थ मंत्रालयाच्या संपर्कात आहेत. यांच्यात ८ मे रोजी चर्चा होणार होती. पण कोरोनाच्या वाढच्या संसर्गामुळे ही बैठक तहकूब करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, महाभाई भत्ता हा पगाराचाच एक भाग आहे. त्यामुळे त्याच्यावर बंदी घालता येऊ शकत नाही.
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता
• केंद्रीय कर्मचाऱ्यांना १७ टक्के महागाई भत्ता मिळत आहे.
• २०१९मध्ये तो वाढवून २१ टक्के करण्यात आला आला होता.
• पण कोरोना महामारीमुळे ही वाढ जुलै २०२१ पर्यंत रोखण्यात आली आहे.
• आता जुलैमध्ये वाढ देताना आधीची थकबाकीही दिली जावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.